शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मुस्लीम बांधवांनी घरालाच बनविले प्रार्थनास्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 15:54 IST

रमजान काळात प्रत्येक घरात नमाज पठण करून रोजा सोडवला जात आहे.

ठळक मुद्देरमजानमध्ये घरी बनवली इबादतगाहप्रत्येक घरात नमाज पठण करून सोडवला जातोय रोजाअनेकांकडून दानधर्म व मदतघर स्वच्छतेवर महिलांचा भरसलग दुसरे वर्ष कोरोनाच्या सावटाखाली 

चंद्रमणी इंगळेहरताळा, ता.मुक्ताईनगर : कोरोना  संकटाने मानवी जीवनाचे वेळापत्रक बदलले आहे. सद्य:स्थितीत सर्वत्र प्रार्थनास्थळे बंद आहेत. यातच रमजानचा महिना सुरू असल्याने मुस्लीम समाज बांधव घरातच इबादतगाह (भोजन) बनवून अल्लाहचे नामस्मरण करीत आहे. रमजान महिन्याचे  पहिले पर्व नुकतेच सुरू झाले आहे. मशिदीत एकत्र जमून प्रार्थना करण्यास बंदी असल्यामुळे मुस्लीम बांधवांनी घरालाच प्रार्थनास्थळ बनविले आहे. आजी-आजोबापासून नातवंडे, सुना, लेकी एकत्र बसून रोजा  व इफ्तार सोडतात. दिवसभर नमाज कुराणचे पठण, विशेष म्हणजे देशातून कोरोना हद्दपार करण्यासाठी अल्लाहला साकडे घातले जात आहे. 

ठरावीकच फळे उपलब्धरमजान महिन्याच्या पहिल्या पर्वात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची फळे व इतर खाद्यपदार्थांची मागणी असते. महिनाभरात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे ठरावीकच फळे उपलब्ध होत आहे. काही फळांचा तुटवडा असल्याने दर वाढले आहेत. परिणामी रोजेदारांना उपलब्ध फळेच घ्यावी लागत आहे.

गरजूंना मदतइस्लाम धर्मात नमाज रोजासह जकात सदका धर्माला विशेष महत्त्व आहे. येथील मुस्लीम बांधव आपल्या परीने संकटात सापडलेल्यांना मदत करीत आहे. अल्लाहला राजी करण्यासाठी दानधर्म करणे महत्वाचे  आहे. सर्वांनी जकात सदकात देऊन गोरगरिबांसह गरजूंची मदत करावी, असे मौलवींकडून सांगितले जाते. कोरोनापासून देशवासीयांसह जगाची लवकरच सुटका व्हावी, शांतता व भाई'चारा नांदो अशी घराघरातून प्रार्थना करण्यात येत आहे.

यंदा सार्वजनिकरीत्या उपवास न सोडता घरीच उपवास सोडून दानधर्म करण्यावर भर दिला आहे. आबालवृद्ध अशा सर्वांनी रोजा ठेवला आहे. रोजा प्रारंभीचे काही दिवस शरीर स्वीकारताना वेळ लागतो. त्यानंतर हा दिनक्रमच बदलून जातो. संपूर्ण महिनाभरात मुस्लीम बांधवांची जीवनशैली बदलून जाते. महिला तर मध्यरात्रीच्या दरम्यान उठून स्वयंपाक करतात. चारच्या सुमारास सर्वजण जेवण आटोपून सहरीच्या वेळी नमाज पठण करतात. त्यानंतर दिवसभर उपवास व सायंकाळी ठरलेल्या वेळी कुटुंबियांसोबत उपवास सोडतात. यापूर्वी अनेकजण मशिदीमध्ये जाऊन रोजा सोडत होते. यंदा कोरोनामुळे व जिल्ह्यात जाहीर केलेल्या संचारबंद मुळे सर्वांनी रोजा इफ्तार  पार्टी घरीच सोडवत असल्याचे चित्र आहे. 

गरीब कुटुंबांना जकातीच्या माध्यमातून मदतईदच्या दिवशी गरीब व्यक्ती या सणापासून वंचित राहू नये म्हणून त्याला मदत करण्यास सांगितले आहे. कारण जर गरीब व्यक्ती या दिवशी चांगल्या गोष्टीपासून वंचित राहात असेल तर ही गोष्ट मुस्लीम धर्मामध्ये योग्य समजली जात नाही. म्हणून गरीब माणसांना ईदपूर्वी जकात दिली जाते. जेणेकरून ही वंचित मंडळीसुद्धा वर्षातील एक दिवस आनंदाने साजरा करू शकतात.

 प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी आपल्या जीवन काळात संपूर्ण मानव जातीला विश्वबंधूत्वाची शिकवण दिली. सामाजिक न्याय,  समता, उदारता, समरसता यांचे महत्त्व विशद केले. त्यांची शिकवण एका विशिष्ट धर्मापुरती मर्यादित नव्हती, तर समस्त विश्वाचे कल्याण व्हावे असे त्यांच्या शिकवणीतून प्रदर्शित होते. -शेख रहेमान शेख उस्मान, कुटुंबप्रमुख रोजेदार, हरताळा

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर