शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

रावेर तालुक्यातील खानापूर येथे मुरुमाचा घोळ अन् नुसताच संशय कल्लोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 19:01 IST

खानापूर ग्रा.पं.च्या पेयजल योजनेंतर्गत सुरू असलेल्या विहीर खोदकामातील ५० ते ६० ट्रॉली माती मिश्रीत मुरूम २६ रोजी रात्री अचानक गायब झाली. संतप्त नागरिकांनी माती चोरी झाल्याची बोंब ठोकली होती. अखेर माती वाहतुकीची पाच हजार रुपयांची वसुली ग्रामपंचायतीने केल्याने माती चोरीचा वाद शमला.

ठळक मुद्देतीन दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये असंतोषमुरूमाची मागणी करणाऱ्या गरजूंना निर्बंध घालण्यात आल्यानंतर निर्माण झाला होता वादपाच हजार रुपये वसुली ग्रामपंचायतीने केल्यानंतर अखेर वादावर पडला पदडा

रावेर, जि.जळगाव : तालुुक्यातील खानापूर ग्रा.पं.च्या पेयजल योजनेंतर्गत सुरू असलेल्या विहीर खोदकामातील ५० ते ६० ट्रॉली माती मिश्रीत मुरूम २६ रोजी रात्री अचानक गायब झाली. संतप्त नागरिकांनी माती चोरी झाल्याची बोंब ठोकली होती. अखेर माती वाहतुकीची पाच हजार रुपयांची वसुली ग्रामपंचायतीने केल्याने माती चोरीचा वाद शमला.पाणीपुरवठ्यासाठी गावठाण जागेत २० फूट व्यासाच्या विहिरीचे तब्बल ५० फूट खोल खोदकाम सुरू आहे. या खोदकामातून ५० ते ६० ट्रॉली मुरूम मिश्रीत मातीतून सभोवतालच्या काही रहिवाशांनी तगारी भरून घराच्या अंगणात टाकण्यासाठी तर काहींंनी वाड्यापाड्यात तथा शेतीकामात भरावासाठी एकेक दोन-दोन ट्रॉली भरून वाहण्यासाठी मागितली होती. त्यावर ग्रामपंचायत व पदाधिकाºयांनी त्या गरजूंना मनाई केली होती.दरम्यान, विहिरीलगतच पडलेला मातीचा ढिगारा २६ रोजी रात्री जेसीबी व पाच-सहा ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करण्यात आल्याने २७ रोजी पहाटे गायब झाल्याचे निदर्शनास आले. मातीमिश्रीत मुरूमाची मागणी करणाºया गरजूंना निर्बंध घालण्यात आलेल्या उभय ग्रामस्थांनी असंतोष व्यक्त केला. तक्रारकर्त्या ग्रामस्थांनी काही ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह ग्रामविकास अधिकारी व्ही.के.महाजन यांच्याकडे धाव घेतली. माती चोरीस गेल्याची बतावणी केली. त्यामुळे उभय नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली.दरम्यान, सरपंच हसीना तडवी व ग्रा.पं. सदस्य एकनाथ नेमाडे, जहीरूद्दीन जहागीरदार, भुवनेश्वर महाजन, मोहन धांडे यांच्याकडे संतप्त नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी राजेंद्रकुमार नरवाडे यांनी आमची परवानगी घेऊन त्या निरूपयोगी असलेल्या मातीची वाहतूक केल्याची माहिती दिली. सदरची माती रात्रीच का वाहण्यात आली? संपूर्ण माती एकाच जणाला कशी दिली? त्याआधी ज्या गरजूंनी माती मागितली त्यांना लिलावाचे कारण का देण्यात आले? लिलाव न करताच परस्पर वाहतुकीला संमती देण्याचे कारण काय? अशी विचारणा संतप्त नागरिकांनी सोमवारी सकाळी ग्राम पंचायतीत येऊन केल्याने गोंधळ उडाला होता.ग्रा.पं. सदस्य यामिनी भारंबे यांचे पती बाळू भारंबे यांनी मातीचोरीची तक्रार द्या अन्यथा बैठक घेऊन सोमवारी संध्याकाळपर्यंत मातीचा तिढा सोडवण्याची मागणी ग्रामविकास अधिकाºयाकडे केली होती. त्यावर राजेंद्रकुमार नरवाडे यांनी जेसीबी उशिरा आल्याने रात्री वाहतूक करावी लागली. पूर्ण मातीचा ढिगारा वाहिल्याची झालेली चूक त्यांनी कबूल केली व तक्रारकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.पुन्हा राधेश्याम बढे यांच्यासह काही संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्या यामिनी भारंबे यांचे पती बाळू भारंबे यांच्यावर आरोप केला. त्यामुळे भारंबे यांनी ग्रामसचिवालयात धाव घेऊन माती चोरीची मला आताच्या आता लेखी तक्रार दाखवा. गाव भडकले असताना तुम्ही कारवाई का करीत नाहीत? एका जणासाठी तुम्ही गावाचा विरोध का पत्करता? तुमच्याकडून काही कारवाई होत नसेल तर राजीनामा द्या, असा आक्रोश ग्रामविकास अधिकाºयाकडे केला. राधेश्याम धांडे यांनी बसस्टॉपवरील सीसीटीव्हीचे फुटेज पाहून त्यांच्याकडून ५०० रुपये ट्रॉलीप्रमाणे दंडात्मक कारवाई का करीत नाहीत, असा संताप केला.त्यावर ग्रा.पं.चे ज्येष्ठ सदस्य एकनाथ नेमाडे यांनी आमच्या परवानगीने माती वाहिली आहे. त्यांनी चूक कबूल केली आहे. म्हणून दंडात्मक कारवाई वा पावतीचा प्रश्न उद्भवत नाही, असे खंडन करताच, बाळू भारंबे यांनी आमच्या शब्दाला काहीच किंमत नाही का, आमच्या सदस्याला काही अधिकार नसेल तर ग्रामपंचायतला कुलूप ठोका, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने त्या शाब्दिक चकमक उडाली. यावेळी देवीदास धांडे, विठ्ठल धांडे, गिरीश धांडे आदींनी तुम्ही तक्रारकर्त्यांचे समाधान न करता हाकलून लावत असाल तर ही दंडेली काही कामाची नाही. एवढी माती होती तर सर्व गरजूंना काही ना काही प्रमाणात समान न्यायाने देण्याची गरज होती, असा युक्तीवाद त्यांनी केला.त्यामुळे एकच गदारोळ झाल्याने ग्रा.पं.सदस्य भुवनेश्वर महाजन, मोहन धांडे, प्रदीप धांडे व ग्रामविकास अधिकारी महाजन यांनी दोन्ही ग्रा.पं. सदस्यांना व संतप्त ग्रामस्थांना आवर घालून शांत केले. तद्नंतर, ग्राम पंचायत पंचकमेटीची तातडीची बैठक आयोजित करून त्यात संबंधितांकडून पाच हजार रुपये रक्कम वसूल करण्याचा निर्णय झाला. त्यांच्याकडून पावती फाडल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी व्ही के महाजन यांनी दिली. परिणामी तब्बल तीन दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये पसरलेली संतापाची लाट अखेर शमली आहे.ग्रामपंचायत पदाधिकाºयांच्या व प्रशासनाच्या पूर्व परवानगीने माती वाहतूक केली. जेसीबीची यंत्रणा रात्री उशिरा दाखल झाल्याने रात्री वाहतूक करावी लागली. यात माझी कोणत्याही प्रकारची चूक नाही. मात्र, माझे व ग्रामपंचायत पदाधिकाºयांचे विरोधक राजकारण करून विरोधासाठी विरोध करीत आहेत. ग्रामपंचायत जो निर्णय घेईल तो मान्य राहील.-राजेंद्रकुमार नरवाडे, खानापूर 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRaverरावेर