शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर शहरात एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 10:35 IST

अमळनेर : आधी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना ३१ रोजी रात्री आठ वाजेच्या ...

अमळनेर : आधी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना ३१ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनीत घडली.३१ रोजी संध्याकाळी पाच वाजता शीतल मुकेश सैंदाणॆ व कमल मुनिर फथरोड यांच्यात भांडण सुरू होते. एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यावेळी राजेश सिद्धी जाधव यांनी हे भांडण पाहिले. मात्र किरकोळ भांडण असल्याने मिटून जाईल म्हणून त्याने दुर्लक्ष केले. त्यानंतर सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास शीतल मुकेश सैंदाणे, मुकेश गोकुळ सैंदाणेव भाग्यश्री उर्फ भुरी राजेंद्र पाटील या तिघांनी कमल फथरोड याला बोलावून घेतले आणि सायंकाळच्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी लाठ्याकाठ्यानी कमलच्या छातीवर, डोक्यावर, कपाळावर व हातावर मारहाण केली. त्यात रक्त सांडून कमल रस्त्यावर पडलेला होता. कमलचा मृत्यू झालेला होता. घटनास्थळी शीतलच्या हातातील बांगड्या फुटून पडलेल्या होत्या.म्हाडा कॉलनी टाकरखेडा रस्त्यावर शहराबाहेर चार कि.मी. अंतरावर असल्याने खून होऊन दोन तास उलटले तरी याबाबत भीतीने कोणीही वाच्यता करायला तयार नव्हते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाल्यावर डीवाय.एस.पी. राकेश जाधव, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी शीतल, मुकेश व भाग्यश्री उर्फ भुरी यांचा शोध घेतला असता ते तिघे फरार झाल्याचे समजले. तिघांनी पातोंडा येथे एका ठिकाणी आश्रय घेतल्याचे समजल्यावर पोलिसांनी तेथून तिघांना अटक केली. तिघांविरुद्ध खुनाचा व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवाय.एस.पी. राकेश जाधव करीत आहेत.कमल पथरोड याच्यावर हाणामाऱ्या, शरीरावर वार करणे अशा प्रकारचे काही गुन्हे दाखल असून, त्याला एका खुनाच्या गुन्ह्यात १४ वर्षे शिक्षा झाली होती. कालदेखील त्याने शीतल सैंदाणे या महिलेस बरे वाईट बोलण्याने त्यांच्यात भांडण होऊन खून झाल्याची चर्चा आहे.