शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांचा ‘लंच टाईम’ अन् दुकानदारांचा ‘ओव्हरटाईम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:56 IST

७ दुकाने सील, १४ हॉकर्सचे साहित्य केले जप्त

जळगाव : लॉकडाऊनमध्ये शिथिलता असली तरी शहरात सम-विषम पध्दतीनेच दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मनपा कर्मचाऱ्यांना न घाबरता अनेक दुकानदार आपला व्यवसाय सुरु केला आहे. आता मनपा कर्मचाºयांच्या जेवणाची वेळ लक्षात घेवून अनेक जणांनी व्यवसाय सुरु ठेवल्याचे प्रकार सुरु आहेत. हेच हेरून सोमवारी मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाने विविध भागातील ७ दुकाने सील करण्यात आली तर १४ हॉकर्सवरदेखील कारवाई केली.मनपाचे पथक एका भागाकडून दूसरीकडे कारवाईला गेल्यानंतर इतर भागातील दुसरे दुकान उघडले जात असते. हीच स्थिती हॉकर्सची देखील आहे. मनपाचे पथक ख्वॉजामिया परिसरात पोहचल्यानंतर बळीराम पेठ, सुभाष चौकातील व्यवसाय सुरु होतात. तर हेच पथक बळीराम पेठेत पोहचले की ख्वॉजामिया चौकातील हॉकर्सची दुकाने थाटली जातात.आतापर्यंत ११२ दुकाने सीलमनपाने लॉकडाऊनच्या काळात शहरातील विविध भागातील ११२ दुकाने सील केली आहेत. तर २५०पेक्षा जास्त हॉकर्सचे सहित्य जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जी दुकाने सील करण्यात आली होती, त्यापैकी ४० हून अधिक दुकानदारांकडून दंड वसुल करून दुकानांचे सील उघडण्यात आले आहेत तर काहींविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सोमवारी केलेल्या पाहणीत बाजारात मोठी गर्दी आढळल्याने उपायुक्त संतोष वाहुळे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार काही हॉकर्सवर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव