शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नोटिसप्रकरणी आता मनपाचे दिलगिरी पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:37 IST

मनपा मालकीचे जागा प्रकरण

जळगाव : मनपा मालकिच्या जागेच्या व्यवसायिक वापरप्रकरणी महापालिकेच्या ‘नोटीस जुमला’ चांगलाच रंगला असून नोटीस बजावलेल्या राष्टÑवादी कॉँग्रेसच्या महिला पदाधिकारी मंगला पाटील यांनी अबु्रनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देताच मनपाने दिलगिरी पत्र देऊन यातून सुटका करून घेण्याच प्रयत्न सुरू केला आहे. नोटीस देणे ही शिपायाची चूक असल्याचे दाखवून मनपाने दिलगिरी व्यक्त करणारे पत्र मंगला पाटील यांना देऊन सुनावनीस उपस्थित न राहण्याचे कळविले आहे.महापालिकेने ३०० हून अधिक आपल्या मालकीच्या जागा शहरातील विविध सामाजिक जागा सेवाभावीवृत्तीने वापरासाठी दिल्या आहेत. मात्र, १०० हून अनेक सामाजिक संस्थांनी या जागांचा व्यावसायिक वापर सुरु केला आहे. मनपाने सेवाभावी वृत्तीने दिलेल्या जागांचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रकार स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत मनपाला नोटीस बजाविण्याचे आदेश २२ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत दिले होते. त्यानुसार मनपाच्यावतीने नोटीस बजावल्या जात आहेत.यामध्ये तत्कालीन नगरपालिकेने १९८८ मध्ये ठराव करुन जागृती महिला मंडळाला सेवाभावी वृत्तीने रिंगरोडवरील जागा वापरण्यासाठी दिली होती. महिला मंडळाने काही वर्षानंतर ही जागा जिल्हा बॅँकेला शाखा सुरु करण्यासाठी भाडेतत्वावर देण्यात आली. मनपाने सेवाभावी वृत्तीने दिलेल्या जागांचा व्यावसायिक वापर करणे नियमबाह्य असतानाही संस्थेने ही जागा जिल्हा बॅँकेला भाडेतत्वावर दिली. त्यामुळे मनपाने या प्रकरणी नोटीस बजावली. मात्र, महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला बाजीराव पाटील यांना ही नोटीस न बजावता राष्टÑवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी मंगला पाटील यांना ही नोटीस बजावली. तसेच ५ डिसेंबरला मनपाने सुनावणीसाठी हजर राहण्याचेही आदेश दिले.या नोटीसमुळे मंगला पाटील संतापल्या. माझी कोणतीही महिला संघटना किंवा संस्था नाही, असे त्यांचे म्हणणे असून नोटीस आल्यानंतर मी देखील संभ्रमात असल्याचे सांगत याबाबत मनपा आयुक्तांची भेट घेऊन याबाबत जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मनपाच्या या अजब कारभाराबाबत मनपा विरोधात अबृ्रनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.त्यानंतर हा प्रकार लक्षात येताच ३० नोव्हेंबर रोजी मनपाने मंगला पाटील यांना पत्र देऊन दिलगिरी व्यक्त केली. त्यात म्हटले आहे की, जागृती महिला मंडळाच्या अध्यक्षा समजून शिपायाकडून ही नोटीस देण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करीत असून पत्राशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पूर्वीचे पत्र रद्द करण्यात येत असून सुनावनीला येण्याची गरज नसल्याचेही नमूद केले आहे.मात्र एकूणच या प्रकरणामुळे मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊन शिपायाच्या कामावर अधिकाऱ्यांचे लक्ष नसते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.मनपाने पत्र दिले असून ते मिळाले आहे. प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून सदर प्रकरणाशी माझा संबंध नसल्याचे पत्रात म्हटले आहे व सुनावनीलाही उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे.- मंगला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव