शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ममुराबाद ग्रामपंचायत पोटनिवडणूक सुनील चौधरी यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 21:49 IST

ममुराबाद, ता. जळगाव : ग्रामपंचायतीच्या वॉर्ड पाचमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागेच्या पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी सोमवारी सुनील गोविंद ...

ममुराबाद, ता. जळगाव : ग्रामपंचायतीच्या वॉर्ड पाचमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागेच्या पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी सोमवारी सुनील गोविंद चौधरी यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.ते जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती (कै.) गोविंद हरी चौधरी यांचे सुपूत्र आणि ममुराबादचे माजी सरपंच हेमंत चौधरी यांचे बंधू आहेत.वॉर्ड पाचमधील अनुसुचित जमाती महिला व नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन राखीव जागांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून मोठी चुरस निर्माण झाली होती. प्रत्यक्षात निवडणुकीला फाटा देत दोन्ही जागा बिनविरोध निवडून आणण्याचा नवा पायंडा यावेळी पाडण्यात आला.निवडणूक यंत्रणेनेदेखील त्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. वॉर्ड पाचमधील अनुसुचित जमाती महिला, हे पद नेमके सरपंचांच्या खुर्चीसाठी राखीव असताना त्या जागेसाठी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र भाग्यश्री गोपाल मोरे यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर कोणीच त्यांच्या विरोधात गेले नाही. त्यामुळे भाग्यश्री यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सोपा झाला. त्याचप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठीसुद्धा माजी सरपंच अमर पाटील तसेच सुनील चौधरी, सोमा नारखेडे आणि हारुन पिंजारी यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज माघारीच्या दिवशी सोमवारी अन्य तिघांनी सामंजस्याने माघार घेतल्याने सुनील चौधरी यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तबझाले.दोन्ही जागांची निवड बिनविरोध झाली असली तरी अधिकृत निकाल ९ डिसेंबरलाच जाहीर होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिंप्राळा भागाचे मंडल अधिकारी रवींद्र उगले, ममुराबादचे तलाठी एस. एस. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव