शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मल्टी स्पेशालिस्ट सायकलची भुसावळात बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:14 IST

आजच्या काळात वाहतुकीसाठी विविध वाहनांचा वापर केला जातो. वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी या इंधनांचा वापर होतो. इंधन मर्यादित आहे. त्याच्या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. पेट्रोल व डिझेल यांच्या दरात नेहमीच वाढ होत आहे. या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यात भुसावळच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना यश आले. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी महिन्यांच्या संशोधनानंतर ‘हायब्रिड सायकल’ निर्माण केली.

ठळक मुद्देसंडे अँकरश्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या अभियंत्याचे नवीन संशोधन

भुसावळ, जि.जळगाव : आजच्या काळात वाहतुकीसाठी विविध वाहनांचा वापर केला जातो. वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी या इंधनांचा वापर होतो. इंधन मर्यादित आहे. त्याच्या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. पेट्रोल व डिझेल यांच्या दरात नेहमीच वाढ होत आहे. या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यात भुसावळच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना यश आले. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी महिन्यांच्या संशोधनानंतर ‘हायब्रिड सायकल’ निर्माण केली.श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीतील जयेश भोई, गीतेश पाटील, सागर जोहरे, निखिल नेमाडे, पवन पालवे, मयूर तायडे, विवेक तायडे, क्रितिका सुडेले, निकिता सुडेले, गरीमा सिंग यांनी सहा महिन्यांच्या संशोधनानंतर हायब्रिड सायकल निर्माण केली.सायकल चार्ज करण्यासाठी सौर ऊर्जेसोबत आणि त्यासोबत अस्तित्वात असलेल्या वीज प्रवाहाचा वापर केला जाऊ शकतो. बॅटरी पॉवर संपली असल्यास आपण पैडलद्वारेदेखील तिला चालवू शकतो. २५ हजार रुपये खर्च आलेली ही सायकल प्रा.गौरव टेंभुर्णीकर व विभागप्रमुख प्रा.अजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली साकारली गेली आहे.भविष्यात पेट्रोलपंपासारखे चार्जिंग स्टेशन तयार केले जावून अभियंत्यांना मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगार मिळणार आहे, असे विभागप्रमुख प्रा.अजित चौधरी यांनी सांगितले.प्रदूषण कमी करणाऱ्या अशा प्रकल्पांना शासनाने आर्थिक मदत करून प्रोत्साहन दिले पाहिजे.या प्रकल्पात नवीन संशोधन करून सायकल अधिक सोयीस्कर बनवून स्वस्त करण्याचा प्रयन्त करणार आहोत, असे सागर जोहरे याने सांगितले. प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.७५ टक्के पैशांची बचतया सायकलमध्ये इ- बाईक वीज मोटर, २४ व्होल्ट, ७ अ‍ॅम्पीइयर हव्हर बॅटरी, डायनॅमो, ४० वॅट सोलर प्लेट, पीडब्लूएम कंट्रोलरचा वापर केला आहे. सायकल ३० किलोमीटरपर्यंत प्रति तासाच्या गतीने धाऊ शकते. उदा. भुसावळ ते जळगाव सहज प्रवास शक्य होईल. कारण सोलरमुळे फ्री चार्जिंग होते किंवा वीज चार्जिंग केल्यास ३ युनिट म्हणजेच १२ रुपये खर्च येऊ शकतो. भुसावळ ते जळगाव एका फेरीसाठी ४० पेक्षा जास्त रुपये खर्च होतो. या प्रकल्पामुळे साधारणत: ७५ टक्के पैशांची बचत होते . शिवाय प्रदूषणसुद्धा होणार नाही.पॉवर लॉकमुळे सायकल सुरक्षीतपॉवर लॉक सिस्टीमच्या साहायाने चाबीमुळे सायकल सुरक्षित राहणार आहे. चोरी होण्याला आळा मिळेल किंवा बॅटरी सुरू किंवा बंद करणे सोयीचे ठरेल. हेड लाईट, बॅक लाईट इंडिकेटर, टर्निंग इंडिकेटर उपलब्ध केलेले असून हॉर्नसोबत गती दर्शवण्यासाठी डिजिटल स्पीडो मीटर लावण्यात आले आहे. एमपीपीटी सोलर चार्जे कंट्रोलरच्या मदतीने सोलर किरणे अधिक असलेल्या भागातुन ऊर्जा घेऊन बॅटरी चार्जे करते. गती कमी जास्त करण्यासाठी थ्रोटल वापरण्यात आले आहे.

टॅग्स :environmentवातावरणBhusawalभुसावळ