मुक्ताईनगर, जि.जळगाव : शहरातील १९ वर्षीय विवाहितेस नोकरीच्या आमिषाने सुरत येथे पळवून नेले. तिला डांबून ठेवत तिच्या अंगावरील साडेसात हजारांचे दागिने काढून घेतल्याची घटना उधना (सुरत) येथे गेल्या आॅगस्टमध्ये घडली. याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहेगीता भास्कर सोळंके (वय १९, रा.प्रभाग क्रमांक १२, मुक्ताईनगर) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभागातच राहणाऱ्या आरोपी रेखा विजय सावळे व तिचा पती विजय सावळे (दोघे रा.प्रभाग क्रमांक १२, मुक्ताईनगर) यांनी उधना सुरत येथे २० हजार रुपये महिन्याची नोकरी लावून देते, असे आमीष दाखवून १३ आॅगस्ट २०१८ रोजी मुक्ताईनगर येथून उधना (सुरत) येथे पळवून नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध तिला ३ आॅक्टोबरपर्र्यंत डांबून ठेवले. याच दरम्यान तिच्या अंगावरील सात हजार ६०० रुपये किमतीचे दागिने खोटे बोलून विश्वासघाताने काढून घेतले.या आशयाची फिर्याद दिली त्यावरून रेखा विजय सावळे व तिचा पती विजय सावळे यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गु.र.नं. १८३/१८, भा.दं.वि. कलम ३६३, ३६६, ३४४, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कैलास भारसके करीत आहे.
मुक्ताईनगरातून विवाहितेस नोकरीचे आमिष दाखवून सुरतेत पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:35 IST
मुक्ताईनगर, जि.जळगाव : शहरातील १९ वर्षीय विवाहितेस नोकरीच्या आमिषाने सुरत येथे पळवून नेले. तिला डांबून ठेवत तिच्या अंगावरील साडेसात हजारांचे दागिने काढून घेतल्याची घटना उधना (सुरत) येथे गेल्या आॅगस्टमध्ये घडली. याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहेगीता भास्कर सोळंके (वय १९, रा.प्रभाग क्रमांक १२, मुक्ताईनगर) यांनी याबाबतची फिर्याद ...
मुक्ताईनगरातून विवाहितेस नोकरीचे आमिष दाखवून सुरतेत पळविले
ठळक मुद्देविश्वासघाताने अंगावरील दागिने काढल्याची तक्रार प्रभागातच राहत असल्याने नेले सुरत येथेमुक्ताईनगरातील पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल