शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

मुक्ताईनगरचा कोरोना रिकव्हरी रेट ७५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:08 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७५.७५ टक्के इतका ठरला आहे

ठळक मुद्देमुक्ताईनगर तालुक्यात ५६५ रुग्ण पॉझिटिव्ह उपचाराने ४२८ कोरोना मुक्त

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोना संसर्गजन्य आजारात १९ आॅगस्टअखेर तालुक्यातील ३२४२ रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आली असून, ५६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ४२८ रुग्ण उपचारा अंती कोरोना मुक्त झाले आहेत, तर १२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७५.७५ टक्के इतका ठरला आहेतालुक्यात कोरोना संसर्गजन्य आजाराचा पहिला रुग्ण जून महिन्याच्या प्रारंभी मिळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत तालुक्यात कोरोना संक्रमण रुग्ण शोधले जात आहे. संसर्ग आटोक्यात नसला तरी जिल्ह्यात बोदवड तालुक्यानंतर सर्वात कमी ५६५ रुग्ण मुक्ताईनगर तालुक्यात गणले जात आहे. आज रोजी मुक्ताईनगर शहरात ३३, तर ९४ ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. शहरात २१, तर ग्रामीण भागात ४९ असे ७० कंटेंटमेन्ट झोन सद्य:स्थितीत आहे.पॉझिटिव्हचे प्रमाण १७.४ टक्केजून महिन्यापासून १९ आॅगस्टपर्यंत तालुक्यातील ३२४२ संशयित रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये १७६४ रुग्णांची प्रथम धुळे व नंतर जळगाव येथे आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यात ३०० रुग्ण कोविड पॉझिटिव्ह निघाले.आरटीपीसीआर तपासणीत पॉझिटिव्ह रुग्ण निघण्याचे प्रमाण १७ टक्के इतके राहिले तर दुसरीकडे उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात १३ जुलै ते १९ आॅगस्ट दरम्यान १४७८ कोविड १९ रॅपिड अँटीजन तपासण्या करण्यात आल्या. यात २६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अँटीजेन तपासणीत पॉझिटिव्ह रुग्ण निघण्याचे प्रमाण १७.९२ टक्के इतके आहे. एकंदरीत, पॉझिटिव्ह रुग्ण सरासरी प्रमाण १७.४ इतके ठरले आहे.रिकव्हरी रेट ७५.७५ टक्केदरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या ५६५ रुग्णांपैकी ४२८ रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट ७५.७५ टक्के इतका ठरला आहे, तर १० रुग्ण कोरोनामुळे मृत्यू पावले असून, आज मितीला तालुक्यातील कोरोना रुग्ण मृत्यू दर हा १.८३ टक्के आहे.१२७ रुग्ण अ‍ॅक्टिव्हआज रोजी तालुक्यात १२७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील २ रुग्ण जळगाव कोविड हॉस्पिटलला, ८ रुग्ण डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, २६ रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात, ७८ रुग्ण शहरातील दोन कोविड केअर सेंटरमध्ये, तर २ रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय ११ रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.तालुक्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि सर्वेक्षण सातत्याने सुरू आहे. कोरोना संक्रमित रुग्ण तत्काळ शोधण्यात यश मिळत आहे. उपजिल्हा रुग्णालय पाठोपाठ चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजेन तपासणी सुरू आहे. पॉझिटिव्ह आलेल्या ५६५ रुग्णांपैकी ४२८ रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक आहे.-डॉ.नीलेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुक्ताईनगर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर