शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी देताहेत स्वयंस्फूर्तीने वार्ड बॉय म्हणून रुग्ण सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 17:24 IST

तीन सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी स्वयंस्फूर्तीने वार्ड बॉयची रुग्ण सेवा देत आहेत.

मतीन शेखमुक्ताईनगर : अपूर्ण मनुष्य बळाने झुंजणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्पुरती नेमणूक झालेल्या वार्ड बॉय कर्मचाऱ्यांनी भीतीने पोबारा केला आहे. नेमणूक झालेल्या पाचपैकी फक्त एक वार्ड बॉय येथे कार्यरत असून, रुग्ण सेवा देण्यासाठी तीन सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी स्वयंस्फूर्तीने वार्ड बॉयची रुग्ण सेवा देत आहेत.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर शहरात उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कोविड डेडीकेटेड केअर सेंटर अशा स्वरूपात स्वतंत्र कक्ष करण्यात आले आहेत. व्हेंटिलेटर, सेमी व्हेंटिलेटर, आॅक्सिजन आणि औषधोपचार अशा स्वरूपात रुग्णांवर उपचार केले जात आहे. आज रोजी ३५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दर दिवसाला कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ज्या बाधितांना तातडीचे व अत्यावश्यक उपचार गरजेचे आहेत असे रुग्ण या ठिकाणी भरती आहेत. एकीकडे रुग्ण वाढ, उपचाराचा ताण तर दुसरीकडे अपूर्ण कर्मचारी संख्या यातून मार्ग काढत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महत्वाचे म्हणजे या कक्षासाठी आवश्यक असलेले वार्ड बॉय संख्याच नसल्याने समस्या गंभीर आहे. सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी स्वयंस्फूर्तीने वार्ड बॉयची रुग्ण सेवा देऊन मोठी मदत करीत आहे.वार्ड बॉयचा पोबाराजिल्हास्तरावरून आपत्कालीन स्थितीत येथे आॅगस्ट महिन्यात तीन वार्ड बॉयची नेमणूक करण्यात आली होती. तीनपैकी २ वार्ड बॉय हजर तर झाले, पण कोरोनाच्या भीतीने त्यांनी पोबारा केला. ते परत आलेच नाही. नंतर स्थानिक स्तरावर तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक यांच्या स्थानिक समितीला अधिकार बहाल करीत स्थानिक पातळीवर वार्ड बॉय पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचे अधिकार देण्यात आल.े त्यात २ वार्ड बॉय पदे भरण्यात आली. यातही एक नवनियुक्त वार्ड बॉय भीतीपोटी आलाच नाही.एकाला कोरोना, दुसरा जखमीदरम्यान, सद्य:स्थितीत एक स्वयंस्फूर्तीने वार्ड बॉयचे काम करणाºया प्रशांत मदारी हा कर्मचारी रुग्णास आॅक्सिजन लावण्यापूर्वीची तयारी करताना झालेल्या अपघातात जखमी झाला, तर अविनाश तायडे या वार्ड बॉयला कोरोना संसर्ग झाल्याने तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. आज रोजी विक्की पाटील हा एकमेव वार्ड बॉय येथे आहे.सुरक्षा रक्षक सफाई कामगार मदतीलावार्ड बॉय कर्मचारी नसल्याने येथे कार्यरत सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने वार्डबॉयचे काम करून डॉक्टर, नर्स पाठोपाठ रुग्णांना मदत करीत आहे. तुषार चौधरी, उमेश चौधरी, रामभाऊ जंगले आणि स्वच्छता कर्मचारी महेंद्र जावे हे आपल्या नियमित कामाव्यतिरिक्त वार्ड स्वयंस्फूर्तीने मध्ये सेवा देत आहेत.जळगाव येथून नियुक्त करण्यात आलेले तीनपैकी २ वार्ड बॉय परतले नाही, तर स्थानिक समितीच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेले दोनपैकी फक्त एक वार्ड बॉय कामावर आहे. पूर्वीपासून कामास असलेल्या २ वार्ड बॉयपैकी एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तर दुसरा जखमी आहे. सुरक्षा रक्षक सफाई कामगार मदत मोलाची होत आहे.-डॉ.शोएब खान, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर