शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक : शिवसेनेने भूमिका बदलल्याने काँग्रेस रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 12:48 IST

विनायकराव देशमुख यांची माहिती

जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अर्ज मागे घेण्याबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याने कॉंग्रेसच्या उमेदवाराचीही उमेदवारी कायम ठेवण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख यांनी दिली.मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस, मनसे यांची महाआघाडी झाली असली तरी तेथे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना व काँग्रेस दोन्हीही पक्षांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्या पार्श्वभूमीवर विनायकराव देशमुख यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, महाआघाडी करताना शिवसेनेला जास्त जागा देणे व अध्यक्षपद कॉंग्रेसकडे ठेवणे असे चर्चेत ठरले होते. त्यानुसार शिवसेनेला ९ व काँग्रेसने सहा जागा वाटप करून घेतल्या.अर्ज दाखल झाल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे काही तांत्रिक बाबीतून अडचणीत आणू शकतात, असे सांगत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी शिवसेना व काँग्रेस असे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज भरून ठेवण्याचे सूचविले. त्यानुसार अर्ज दाखल करण्यात आले. मात्र ऐनवेळी चंद्रकांत पाटील यांनी भूमिका बदलली व अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आम्हीही उमेदवारी कायम ठेवली, असे विनायकराव देशमुख यांनी स्पष्ट केले.एकवेळ राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असता तर त्यास काँग्रेसने पाठिंबा दिला असता, मात्र शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर राज्यात चुकीचा संदेश जाईल, असेही देशमुख यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव