शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाई पालखीचे १८ रोजी प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 18:57 IST

महाराष्ट्रातील सात मानाच्या पालखी सोहळ्यापैकी एक असलेल्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचे यंदाच्या पंढरपूर येथील आषाढ वारीसाठी १८ जून रोजी सकाळी दहा वाजता प्रस्थान होणार आहे.

ठळक मुद्देयंदाचा संकल्प ‘ हरीत वारी, निर्मल वारी’३४ दिवसांचा होणार पायी प्रवास२० जुलै रोजी पंढरपूरला आगमन होणार

आॅनलाईन लोकमतमुक्ताईनगर, दि.१ : संपला सोहळा नावडे मनाला! लागला टकळा, पंढरीचा!जावे पंढरीसी आवडे मनासी!कधी एकादशीच्या आषाढी हे !या उक्तीनुसार महाराष्ट्रातील मानाच्या प्रमुख सात पालख्यातील एक असलेल्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूर आषाढी वारीसाठी येत्या १८ जून, सोमवार रोजी समाधीस्थळावरून प्रस्थान होणार आहे.आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी पंढरपूर येथे महाराष्ट्रातील प्रमुख मानाच्या पालख्यांसह शेकडो दिंड्या व लाखो वारकरी लाडक्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पायी येण्याची परंपरा आहे. संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर) येथून ३०९ वर्षांपासून जाणाऱ्या मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे प्रस्थान १८ जून रोजी सकाळी १० वाजता जुने मुक्ताबाई मंदिरातून विधिवत पादूका पूजन करून आणि हजारो वारकरी, भाविकांच्या उपस्थितीत होईल. शहरातून नविन मंदिरात दुपारी विसावा घेवून पहिल्या सातोड मुक्कामी पालखी रवाना होईल.मलकापूर, बुलढाणा, चिखली, जालना, बीड, भूम, माढामार्गे असा ३४ दिवसांचा पायी प्रवास करीत २० जुलैला पंढरपूर येथे पालखी पोहोचेल. पालखीत भाविकांच्या सोयीसाठी संस्थानकडून सर्व व्यवस्था करण्यात येत आहे.वारीसोबत येणाºया इच्छुक भाविकांनी १७ रोजी जुने मंदिर कोथळी येथे हजर राहून नावनोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष रविंद्र पाटील , पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे यांनी केले आहे.