शहरं
Join us  
Trending Stories
1
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
2
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
3
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
4
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
5
सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
6
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
7
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
8
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
9
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
10
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
11
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
12
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
13
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
14
बॉलिवूडवर शोककळा! पंकज धीर यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचं निधन, ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
16
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
17
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
18
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
19
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी

मुक्ताईनगर मुख्याधिकाऱ्यांनी रात्री केले कोरोना मृतकावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:08 IST

कोरोनाग्रस्ताचे निधन झाल्यावर रात्री साडे अकरालादेखील मुख्याधिकाऱ्यांनी स्मशानभूमीत हजेरी लावली.

ठळक मुद्देरात्री साडेअकराला स्मशानभूमीत लावली हजेरीमहिला मुख्याधिकाऱ्यांच्या माणुसकीचा आगळा अनुभव

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : केवळ महिनाभरापूर्वीच मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी चंद्रपूर जिल्ह्यातून बदलून आलेल्या अश्विनी गायकवाड यांच्या कार्याचा धडाका जोरदार सुरू असून, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात साफसफाई तसेच प्रवर्तन चौकात मास्क न लावणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारत असतानाच मुक्ताईनगरवासीयांना मंगळवारी आगळा-वेगळा, माणुसकीचे दर्शन घडविणारा अनुभव मुख्याधिकाऱ्यांच्या रूपाने पाहायला मिळाला.मंगळवारी रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेला एक रुग्ण मयत झाला व त्या मयत रुग्णावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांवर आली. मात्र सफाई कर्मचारी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने तशी माहिती मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांना मिळाली. रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी नगर पंचायतीचे कर निरीक्षक अच्युत निळ यांना भ्रमणध्वनीवरून ाहिती देत आपल्या इतर नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांना तत्काळ बोलावून घेतले. याप्रसंगी कर निरीक्षक अच्युत निळ, सचिन काठोके, सुनील चौघरी, रत्नदीप कोचुरे, गणेश कोळी, गोपाल लोहेरे, राहुल पाटील या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता पीपीई किट परिधान करून मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड आणि नगरपंचायतीच्या पथकातील सर्व कर्मचारी क्षणात कोविड रुग्णालयात पोहोचले. त्या ठिकाणी कीट परिधान करून सर्व कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. याप्रसंगी मयत व्यक्तीचा मुलगा आणि मुलगी हे नातेवाईक उपस्थित होते. मात्र कर्मचारी व मुख्याधिकाऱ्यांयांनी क्षणाचीही वेळ न दवडता मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची जमवाजमव केली. एवढेच नव्हे तर स्मशानभूमीत रात्रीअकरा वाजताच लाकडांची व्यवस्था करण्यात आली.रात्री साडेदहा वाजता मिळालेल्या संदेशानंतर जवळपास एक तास पूर्वतयारी केल्यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी व त्यांचे पथक आणि मयताचे मुलगा व मुलगी हे स्मशानभूमीत पोचून रात्री एक वाजेपर्यंत अंत्यसंस्काराचा सोपस्कार पार पाडला.शासकीय कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेबद्दल सर्वदूर परखड टीका नेहमीच केली जाते. परंतु मुख्याधिकारी गायकवाड यांच्या रूपाने मुक्ताईनगर तालुक्याला एक धडाकेबाज महिला मुख्याधिकारी मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शासकीय अधिकारीदेखील माणुसकीचे दर्शन घडवतात; याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुख्याधिकारी होय.एवढेच नव्हे तर एक महिला असल्याची जाणीव असतानादेखील कोणतीही भीती न बाळगता रात्री साडेअकरा वाजेपासून एक वाजेपर्यंत स्मशानभूमीत थांबून आणि आपल्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा उत्साहदेखील वाढवून आपल्या कार्याचा व माणुसकीचा आगळावेगळा ठसा मुख्याधिकारी यांनी उमटवला आहे.या प्रसंगामुळे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण आहे. असा अधिकारी असेल तर काम करायचा आनंद वेगळाच मिळतो, अशा प्रतिक्रिया कर्मचारी व्यक्त करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर