शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

मुक्ताईनगर येथे विद्यार्थिनीला डंपरची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : येथील संत मुक्ताबाई महाविद्यालय येथे एम. कॉम. या विभागात शिक्षण घेत असलेली नायगाव येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुक्ताईनगर : येथील संत मुक्ताबाई महाविद्यालय येथे एम. कॉम. या विभागात शिक्षण घेत असलेली नायगाव येथील कु.स्वप्नाली प्रभाकर पाटील ही महाविद्यालयात  जात असताना रस्त्यावर पडलेल्या गिट्टीच्या गंजीतील दगडांत सदर विद्यार्थींनीचा पाय घसरला व त्यातच  रोडच्या कामावर असलेले सुसाट ढंपर आल्याने विद्यार्थीनीला  धडक बसली  व त्यात सदर  मुलीच्या पाय व डोक्यास जबर मार बसला.  त्याच वेळेस एस. एम. कॉलेज समोर असलेले  निलेश मेढे व सामाजिक कार्यकर्ता आसिफ शेख या दोघ तरुणांनी जखमी विद्यार्थीनीला तात्काळ मदतीसाठी पुढे सरसावले व तिला शहरातील  पाटील हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर जगदीश पाटील यांच्याकडे उपचारार्थ तात्काळ घेऊन गेले.डॉ पाटील यांनी विद्यार्थींनीवर  प्रथम उपचार केला.मात्र गंभीर झालेली असल्याने तिला पुढील उपचारार्थ  जळगाव येथील खासगी रुग्णालयात  हलविण्यात आले आहे.    शहरातून  इंदोर ते औरंगाबाद या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे . या कामावर ठेकेदाराद्वारा  ढंपर द्वारे कामाचे साहित्य वाहून आणले नेले जाते . त्यातच रस्त्याची पूर्ण एक साईड खोदकाम करून काँक्रीटीकरण सुरू असल्याने दुसऱ्या बाजूने प्रचंड रहदारी ची समस्या निर्माण होत आहे .त्यातच या कामावरील ढंपर चालक सुसाट वाहन चालवितात व रोजच येथे किरकोळ अपघात होण्याचे प्रकार वाढलेले आहेत. तसेच वाहतुकीची कोंडी व ठेकेदारांची बेशिस्त वाहतूक यावर कोणत्याच अधिकाऱ्याचा वचक नाही .तसेच रहदारी सुरळीत करण्यासंदर्भात पोलीस प्रशासन देखील दिसून येत नाही .त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. आणि संबधितांना एखाद्या मृत्यू घंटेची प्रतीक्षा आहे का ? असा संतप्त सवाल देखील उपस्थित होत आहे .    बोदवड ते  मुक्ताईनगर तसेच मुक्ताईनगर ते इच्छापुर (मध्यप्रदेश) येथे सुरू असलेल्या काँक्रीटच्या रस्त्याच्या कामांमुळे ठीकठिकाणी रस्ते खोदलेले असून या खड्ड्यामुळे आजपर्यंतदोन चाकी तीन चाकी तसेच चार चाकी वाहने अशी अनेक वाहनं घसरुन तसेच त्या खड्ड्यात पडून काही वाहन चालकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहींना आपले अवयव गमवावे लागले आहेत. कायमचे अपंगत्व आले आहे .      खड्डे खोदलेले असताना त्याठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावलेले नसतात.  तसेच रस्त्यांवर गिट्टी पडलेली असते त्यावरून दुचाकी वाहने घसरतात. हीच गिट्टी डंपरच्या साह्याने वाहून  नेताना शहरातील मुख्य रस्त्यांवर गिट्टी व वाळू पडलेली असते . यामुळे यापूर्वीसुद्धा लोकांनी तसेच वाहनचालकांनी सरस्वती कंस्ट्रक्शन बाबत अनेक तक्रारी केलेल्या आहेत. परंतु त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर विभागांचे सपशेल दुर्लक्ष करीत आहे    मुक्ताईनगर शहरात राहणारी की समस्या...   गेल्या महिनाभरापासून मुक्ताईनगर शहरात मोठ्या प्रमाणात रहदारीची समस्या निर्माण झाली आहे बोदवड चौफुली ते स्मशानभूमी पर्यंत खामखेडा रस्ता पर्यंत खोदकाम एकाबाजूने झालेले असल्याने मोठ्या प्रमाणात आधारची समस्या निर्माण होत आहे संपूर्ण शहरातील वाहतूक ही एकेरी रस्त्याने होत असताना मुक्ताईनगर शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांच्या प्रवेशामुळे रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे यासंदर्भात अवजड वाहनांची वाहतूक ही वडगाव फाटा मार्गे वळवण्यात यावी अशी देखील प्रवासी मागणी करत आहेत.

सरस्वती कन्स्ट्रक्शन च्या ठेकेदार व मॅनेजर ला आ.चंद्रकांत पाटील यांनी दिल्या कानपिचक्या       विद्यार्थीनीच्या अपघाताची माहिती कळताच आ.चंद्रकांत पाटील यांनी संबधीत ठेकेदार व मॅनेजरला भ्रमणध्वनीवरून याबद्दल जाब विचारला तसेच शहरातून रस्त्याचे पूर्वी बांधकाम  केलेल्या गटारी पेक्षा कमी उंचीवर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे .यामुळे शहरातील दुकानांवर आलेले ग्राहक हे गटार उंचीमुळे रस्त्यावरच वाहने उभी करतील व प्रचंड राहदारीची समस्या भविष्यात निर्माण होईल .तसेच रस्त्याच्या दुभाजकात शहराच्या सुंदरतेत भर निर्माण करतील अशी अशोक वृक्षांची व इतर आकर्षक झाडे लावावीत. कामातून उडणारी प्रचंड धूळ यावर उपाय म्हणून पाण्याची बारीक शी फवारणी होत असलेल्या कामावर व रहदारी सुरू असलेल्या रस्त्यावर ठेकेदाराने करावी याबद्दल संबधीतांना सूचना केल्या आहेत .तसेच तहसिलदार शाम वाडकर यांना देखील याबाबत कारवाई व्हावी अशी सूचना केली आहे