शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्त टळला.... स्वच्छ सर्वेक्षण समिती फिरकलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:17 IST

३१ जानेवारीची मुदतही संपली

जळगाव : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ अंतर्र्गत जानेवारी महिन्यात तीन वेगवेगळ्या समित्यांकडून शहराची तपासणी केली जाणार होती. मात्र, ३१ जानेवारीपर्यंत तपासणी करण्याची मुदत संपली असतानाही हगणदरी मुक्तीबाबतची तपासणी करणाऱ्या समितीला अद्यापही तपासणीचा मुहूुर्त सापडलेला नाही. तर इतर दोन समित्यांनी शहराची पाहणी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत प्रशासन पूर्ण अनभिज्ञ आहे.‘स्वच्छ सर्वेक्षण’ समितीच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने चांगलाच गाजावाजा केला होता. शासनाकडून महिनाभरात तीन वेगवेगळ्या समित्यांकडून ही पाहणी करण्यात येणार होती. त्यात शहरातील कचºयाचे होणारे संकलन, कचºयाचे होणारे विलगीकरण व प्रक्रिया या दोन प्रक्रियांबाबतची पाहणी करण्यासाठी दोन समित्यांनी पाहणी केली. तिसरी समिती हगणदारी मुक्त शहराची पाहणी करण्यासाठी येणार होती. मात्र, ही समिती मुदत संपल्यानंतरही शहरात दाखल झालेली नाही.दोन समित्यांकडून पाहणी आरोग्य विभागाला मात्र माहितीच नाहीजानेवारी महिन्याचा दुसºया आठवड्यात शहरात केंद्र शासनाच्या दोन समित्या दाखल झाल्या होत्या. तसेच समिती सदस्यांनी शहरातील विविध भागात जावून पाहणी देखील केली होती. याबाबत मात्र आरोग्य विभागाला अनभिज्ञ ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी स्वच्छता समितीसमोर सफाईचे वाभाडे काढण्याचा इशारा दिल्यामुळे आरोग्य विभागाने ही माहिती लपविल्याचीही शक्यता पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.फिडबॅक अर्ज भरण्याचे काम सुरुस्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मनपाने नेमलेल्या संस्थेकडून नागरिकांचे स्वच्छतेबाबतचे फिडबॅक अर्ज भरण्याचे काम सुरु असून, आतापर्यंत ७ हजार नागरिकांचे फिडबॅक अर्ज भरून घेण्यात आले आहेत. सहा महिन्यात एकूण ५० हजार नागरिकांचे फिडबॅक अर्ज घेतले जाणार असून, सर्व अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, शहरातील स्वच्छतेची समस्या कायम असून,प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचविले जात असल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव