शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव येथील गिरणा नदीवरील मातीचा कच्चा बंधारा पाण्यात फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 19:49 IST

गिरणा नदीवर बांधलेल्या मातीच्या कच्च्या बंधाऱ्याचा काही भाग गिरणा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे २० रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास वाहून गेला आहे.

भडगाव, जि.जळगाव : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने तीन वर्षांपूर्वी येथील गिरणा नदीवर बांधलेल्या मातीच्या कच्च्या बंधाऱ्याचा काही भाग गिरणा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे २० रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास वाहून गेला आहे. यामुळे पालिकेने कच्च्या बंधाºयावर केलेला खर्च वाया गेला आहे.भडगाव शहरात पक्का बंधारा नाही. ग्रामपंचायतीच्या काळाप्रमाणेच पालिकेने निधी खर्चून येथील गिरणा नदीवर मातीचा कच्चा बंधारा बांधला होता. हा बंधारा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मोलाचा ठरतो. मागील काळात गिरणा नदीच्या पुरात हा मातीचा कच्चा बंधारा वाहिल्याने नुकसान झाले होते. पालिकेने हा बंधारा दुरुस्त केल्याने बंधाºयात गिरणेच्या आवर्तनाच्या पाण्याने शहराच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागत होती. दुष्काळी काळातही हा बंधारा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी फायद्याचा ठरला आहे. या महिन्यात परिसरात झालेल्या पावसाच्या पुराने हा बंधारा बराच जलाशयाने भरला होता. मात्र गिरणा धरणातून सोडलेल्या पाण्याने या मातीच्या बंधाºयाचा काही भाग वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. नदीवरील काही भाग दगडी, सिमेंटची भिंत असल्याने काही भाग सुरक्षित आहे. गिरणा धरणातून सध्या गिरणा नदीला ४००० क्युसेस पाणी सोडले आहे. अजून पाणी सुटल्यास किंवा याच पाण्याच्या प्रवाहात बंधाºयाचा उर्वरित मातीचा भाग वाहून जाण्याची भीती आहे. गिरणा नदीवर पालिकेने निधी खर्चून बांधलेला कच्चा बंधारा शहरासाठी फायद्याचा ठरत होता. मात्र हा बंधारा फुटत असून वाहत आहे. त्यामुळे भडगावला पक्का बंधारा होण्यापूर्वीच हा कच्चा बंधारा फुटल्याने, वाहिल्याने पालिकेने खर्च केलेला पैसा पाण्यात वाहून गेला आहे.भडगावला पक्का बंधारा झाला असता तर आज ही वेळ आली नसती, अशी शहरातील नागरिकात चर्चा आहे. या बंधाºयावर मासे पकडण्यासाठी मासेमारी करण्यासाठी सध्या गर्दी होत आहे. बंधाºयावर नागरिकांची एकच गर्दी उसळली आहे. 

टॅग्स :RainपाऊसBhadgaon भडगाव