शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

डिपीचा वाढदिवस साजरा करुन महावितरणचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:44 IST

जळगाव : जळालेल्या डीपीच्या ठिकाणी महावितरणतर्फे नवीन डिपी बसविण्यात आली. मात्र, वर्षभरानंतरही महावितरणतर्फे ही डिपी सुुरु न करण्यात आल्याने, ...

जळगाव : जळालेल्या डीपीच्या ठिकाणी महावितरणतर्फे नवीन डिपी बसविण्यात आली. मात्र, वर्षभरानंतरही महावितरणतर्फे ही डिपी सुुरु न करण्यात आल्याने, कांचन नगर परिसरातील रहिवाशांनी सोमवारी दुपारी या डिपीचा चक्क वाढदिवस साजरा करुन महावितरणच्या निषेध नोंदविला.कांचन नगरला लागून असलेल्या महावीर नगरातील विद्युत डिपीचा अचानक स्फोट होऊन ही डिपी पूर्णपणे जळाली होती. परिणामी या डिपीवरील नागरिकांची तात्पुरती विज जोडणी, तात्पुरता विद्युत खांब उभारुन त्यावर करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी महावितरणतर्फे जळालेल्या डिपी जवळ नवीन डिपी उभारण्यात आली. यावेळी महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी नव्या डिपीवरुन लवकरच जुन्या ग्राहकांची वीज जोडणी करुन डिपी सुरु करणार असल्याचे नागरिकांना आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष उलटुनही ही डिपी सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारी दुपारी परिसरातील महिला व पुरुषांनी एकत्र येऊन महावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत डिपीला हार घालून अनोख्या पद्धतीने गांधीगिरी करत डिपीचा वाढदिवस साजरा केला.अधिकरी व मक्तेदार दुर्लक्ष करत असल्याने रहिवाशांचा संतापसोमवारी येथील नागरिकांनी या डिपीचा अनोखा वाढदिवस साजरा करुन महावितरणचा निषेध नोंदविला. यावेळी रहिवाशांनी सांगितले की, डिपीचे काम झाल्यानंतर सुरुवातीपासूनच डिपी सुरू करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करित आहोत. सुरुवातीला अधिकाºयांनी लवकरचं डिपी सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिना उलटुनही डिपी सुरू करण्यात आली नव्हती. त्यानंतर पुन्हा अधिकाºयांना विचारणा केली असता, त्यांनी मक्तेदाराकडे बोट करुन, काम अपुर्ण असल्याचे सांगितले. तर मक्तेदाराने कामाचे बिल मिळाले नसल्याचे सांगितले. काही दिवस अधिकारी व मक्तेदार एकमेकांकडेच बोट दाखवित राहिले. या संदर्भात कार्यकरी अभियंता संजय तडवी यांच्याकडेदेखील तक्रार केली होती. त्यानींही लवकरचं डिपी सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, तरीदेखील डिपी सुरु झालीच नाही.डिपीचे बसविण्याचे काम दिलेल्या मक्तेदाराला डिपी सुरु करण्यासंदर्भात अनेकवेळा सांगितले आहे. मात्र, ते वेळोवेळी काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याचे सांगून, काम पुढे ढकलतात. या प्रकारा संदर्भात आपण वरिष्ठांकडे देखील तक्रार केली आहे.-रोहित गोवे, सहायक अभियंता,शनिपेठ विभाग, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरणJalgaonजळगाव