शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

धरणगावला सोमवारपासून जैन धर्माचा श्री पंचकल्याणक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 3:10 PM

धरणगाव येथील पुरातन श्री.पार्श्वनाथ दिगंबर जैन क्षेत्रावर शतकानंतर श्री पंचकल्याणक महोत्सव २४ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान होणार आहे.

ठळक मुद्देपरमपूज्य मुनिश्रींचा सहवास लाभणारराज्यभरातील जैन समाज बांधव येणार२४ ते ३० डिसेंबर दरम्यान असतील भरगच्च कार्यक्रम

धरणगाव, जि.जळगाव : येथील पुरातन श्री.पार्श्वनाथ दिगंबर जैन क्षेत्रावर शतकानंतर श्री पंचकल्याणक महोत्सव २४ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान होणार आहे. संत शिरोमणी जैनाचार्य आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांचे अग्रणी शिष्य प.पू. मुनींश्री अक्षयसागरजी महाराज, मुनीश्री नेमीसागरजी महाराज आणि क्षुल्लक श्री समताभूषण महाराज यांच्या मंगल सानिध्यात हा महोत्सव होईल.प्रतिष्ठाचार्य बाल ब्रह्मचारी विनयभैया (बंडा) आणि तात्या भैयाजी असून, मूलनायक ‘आदिनाथ’ भगवंतांची मूर्ती श्रमजीवी महिला मैनाबाई पन्नालाल डहाळे यांनी प्रदान केली आहे. अन्य भाविकांनी ‘चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती’ प्रदान केल्या आहेत. तसेच मानस्तंभाची निर्मिती रिता अजित डहाळे ह्यांनी केली आहे.कार्यक्रम स्थळाच्या भव्य प्रवेशद्वाराची निर्मिती मातोश्री प्रेमाबाई जैन व महेंद्र जैन ह्यांच्या स्मरणार्थ शैलेंद्र जैन, जैनेंद्र जैन व डॉ.प्रमोद जैन ह्यांनी निर्माण केली आहे. त्याचे लोकार्पणही या वेळी होणार आहे.तसेच ‘पांडुकशीला’ गांधी मळ्यात, तर ‘त्यागी निवास’ निर्मितीचे कार्य अजित डहाळे व तनय डहाळे यांनी केले असून, त्याचेही लोकार्पण होईल. मंदिराचे प्रवेशद्वार शिशुपाल डहाळे ह्यांच्या स्मरणार्थ मिलिंद व राजेश डहाळे यांनी निर्माण केले आहे.आणि चोवीस तीर्थकर वेदी मंदाबाई रतनलाल डहाळे यांच्या स्मरणार्थ सुदेश श्रीकांत डहाळे ह्यांनी निर्मिती केली आहे. त्यांचेही अनावरण व शुद्धीकरण मुनिवर्यांच्या सानिध्यात होणार आहे. ह्या सर्व कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राहुल जैन आणि मोहन गांधी यांनी केले आहे. सदर कार्यक्रम भगवान आदिनाथ दिगंबर जैन धर्म संस्कृती क्षेत्र (गांधी मळा) येथे होणार आहे.ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन १००८ श्री आदिनाथ पंचकल्याणक महोत्सव समिती, श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, श्री मुनी सेवा संघ समिती, जैन उत्सव मंडळ, राजुलमती महिला मंडळ, चंदना महिला मंडळ यांनी केले आहे.या कार्यक्रमांसाठी सर्वश्री रवींद्र जैन, संजीव जैन, राहुल जैन, सावन जैन, अजित डहाळे, प्रतीक जैन, श्रेयान्स जैन, श्रीकांत जैन, निकेत जैन, राजेश जैन, पीयूष डहाळे, सुजित जैन, शैलेंद्र जैन, राजेश डहाळे, विवेक लाड, अजय महाजन, मधुकर लाड, प्रफुल्ल जैन, उदय डहाळे, स्वप्नील जैन, विनोद जैन, सौरभ डहाळे, डॉ.सचिन जैन, डॉ.मनीष जैन, डॉ.सूचित जैन, भावेश शहा आदी परिश्रम घेत आहेत. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमDharangaonधरणगाव