शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ‘लॅब’च्या विश्वासार्हतेवरच खासदारांनी उपस्थित केला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:23 IST

निगेटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांना होतोय पुन्हा त्रास

जळगाव : कोरोनाच्या चाचणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेकडून (लॅब) ज्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्या रुग्णांना त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचा दावा खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे. या प्रयोगशाळेत योग्य तंत्राचा वापर होत आहे की नाही या विषयी आपण तज्ज्ञांकडून माहिती घेणारआहोत आणि भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडे (आयसीएमआर) लॅबविषयी तक्रारही करणार असल्याचे खासदार पाटील म्हणाले.कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर जळगावात घेण्यात आलेले नमुने (स्वॅब) पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. त्यानंतर धुळे येथे लॅब सुरू झाली व तेथे हे नमुने पाठविण्यात येऊ लागले. मात्र रुग्णसंख्या वाढतच असल्याने जळगावात लॅब सुरू करण्याची मागणी होऊ लागली व त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लॅब सुरू करण्यात आली.जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता खासदार उन्मेष पाटील यांनी या प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित केली आहे. या प्रयोगशाळेतील अहवालाबाबत आपल्याकडे तक्रारी आल्या असून ज्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले त्यांना पुन्हा त्रास होत असल्याचे खासदार पाटील म्हणाले. यात उदाहरण म्हणून त्यांनी जामनेर व पारोळा येथील रुग्णांच्या अहवालाचा संदर्भ दिला.अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अशा रुग्णांना घरी सोडण्यात आले व पुन्हा त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे खासदार म्हणाले. अहवाल व्यवस्थित आले तर रुग्णांवर उपचारही करता आले असते. मात्र जर प्रयोगशाळेचे अहवालच संशयास्पद येत असतील तर रुग्णांवर उपचार तरी कसे होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगशाळेची सर्व माहिती आपण मागविली असल्याचे खासदार म्हणाले. लॅबला मान्यता दिली असली तर तेथे योग्य तंत्राचा वापर होत आहे की नाही, याची तज्ज्ञांच्या मदतीने खात्री करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव