शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार रक्षा खडसेंनी केले नाथाभाऊंचे औक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 15:46 IST

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे त्यांच्या स्नुषा तथा भाजप खासदार रक्षा खडसे यांनी औक्षण केले.

ठळक मुद्देभाजपातच राहणार असल्याचे रक्षा खडसेंनी आधीच केले आहे स्पष्टराष्ट्रवादीत प्रवेश अन घरी भाजप आप्तस्वकीयांकडून स्वागतराजकीय वृत्ताकनासाठी केंद्रबिंदू ठरतोय खडसे परिवार

मतीन शेखमुक्ताईनगर : भाजपातून राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर दसऱ्याला रविवारी दुपारी घरी पोहोचलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कोथळी येथील घरात प्रवेश करताच त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांचे औक्षण केले. याप्रसंगी सासू मंदा खडसे व कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.एकनाथराव खडसे यांच्या भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमोल्लंघनापूर्वी मी व जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात आहे, स्नुषा खासदार रक्षा खडसे भाजपात राहतील, असे स्पष्ट केले होते. त्याच दरम्यान खासदार खडसे यांनीही भाजपात राहणार असल्याचे म्हटले होते.दरम्यान, आजचा प्रसंग बाका होता. खडसे सध्या राज्यात राजकीय वृत्ताकनासाठी केंद्रबिंदू ठरत आहे, त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश आणि घरी भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याकडून औक्षण करून स्वागत असे चित्र रविवारी दुपारी पाहायला मिळाले. एक मात्र नक्की येथे राजकारणावर कुटुंब आणि संस्कृती भारी पडले.

टॅग्स :PoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर