शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खड्डयांमध्ये वृक्षारोपण करीत शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 17:17 IST

युवा सेनेच्या पदाधिकाºयांनी केले रास्ता रोको आंदोलन

ठळक मुद्देरस्त्यावरील खड्डयांमध्ये वृक्षारोपण करीत युवा सेनेने केले आंदोलनशिवसैनिकांच्या रास्तारोको आंदोलनामुळे रहदारीचा खोळंबासार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतनेरी ता.जामनेर, दि.१७ : रस्त्यांची मोठ्या प्रमाणात होत असलेली दुरवस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष याचा निषेध करण्यासाठी शिवसेने मंगळवारी सकाळी म्हसावद चौफुलीवरील खड्डयांमध्ये वृक्षारोपण करीत अनोखे आंदोलन केले. यावेळी रास्ता रोको आंदोलन करीत शासनाचा निषेध नोंदविला.शिवसेनेतर्फे म्हसावद चौफुलीवर वाहतूक अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मोठ्या खड्डयांमध्ये झाडांचे रोपटे लावून विधिवत पूजा आरती करीत जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. जवळपास एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.जळगाव-औरंगाबाद मार्गावर अनेक खड्डे पडलेले असून वाहन चालवणे कठीण झाले आहे. यामुळे अनेक वेळा लहान मोठे अपघात होत असतात. खड्डे बुजवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.म्हसावद चौफुलीपासून जामनेर ते नेरी हा १३ किमी रस्ता, जळगाव ते औरंगाबाद हा जळगाव हद्दीतील ६५ किमी चा रस्ता तर नेरी ते एरंडोल ३५ किमी चा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यांची अक्षरश: चाळणी झालेली असून खड्डे चुकवण्यासाठी वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.आंदोलनात युवा सेना उपजिल्हाध्यक्ष अ‍ॅड.भरत पाटील , विद्यार्थी सेना तालुका संघटन विश्वजित मनोहर पाटील, अनिल चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, सुधाकर सोनवणे, अजय राजपूत, नाना सोनार, नीलेश खरे, शाम बोरसे, नेरी शहर अध्यक्ष रिजवान मण्यार, भूषण कोळी, अमोल कोळी, भूषण जंजाळे, कृष्णा सोनवणे, सागर पाटील, संतोष पारधी, सचिन बेलदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग