शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात महसूल कर्मचा-यांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 12:10 IST

अपर जिल्हाधिका-यांना निवेदन

ठळक मुद्दे बंदमुळे कामकाज ठप्प15 तालुक्यातील 432 तलाठी, 73 मंडलाधिकारी, अव्वल कारकूनांनी लेखणी बंद आंदोलनात सहभाग घेतला

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21-  अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांच्यावर 17 जानेवारी रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केलेले आंदोलन  दुस:या दिवशीही सुरूच होते. तलाठय़ावर हल्ला करणा:यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी जळगाव जिल्हा तलाठी संघाने आज अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान कालपासून तलाठय़ांच्या संपामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वसूल झालेला नाही. जिल्ह्यातील सुमारे तीनशे तलाठय़ांनी एकत्र येऊन निवेदन दिले. 

वरील घटनेच्या निषेधार्थ जिल्हा तलाठी संघातर्फे कालपासून लेखणी बंद सुरू झाले. सर्व तलाठी, मंडळाधिकारी काळ्या फितीलावून आंदोलनात सहभागी झाले. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 432 तलाठी, 73 मंडलाधिकारी, अव्वल कारकूनांनी लेखणी बंद आंदोलनात सहभाग घेतला. यामुळे अनेक ठिकाणची तहसील कार्यालये आज बंद होती. काही ठिकाणी कार्यालय सुरू होती मात्र तलाठी, मंडलाधिकारी नसल्याने महसूल वसुली, विविध दाखले तयार झाले नाहीत. 

संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या हल्ल्याने तलाठी संवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तलाठी बांधवांचे मनोबल खच्चीकरण झाले आहे. जोपयर्ंत हल्ला करणा:या सर्व संशयितांना अटक होत नाही तो पयर्ंत जिल्हा तलाठी संघ आंदोलन सुरू ठेवणार आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष एन. आर. ठाकूर, सरचिटणीस जे. डी. भंगाळे, कार्याध्यक्ष आर. आर. महाजन, संघटक व्ही. आर. मानकुंबरे, उपाध्यक्ष योगेश पवार, विभागीय उपाध्यक्ष आर. डी. पाटील, महिला प्रतिनिधी मोनिका बडगुजर, तालुकाध्यक्ष वनराज पाटील आदी उपस्थित होते. 

अप्पर पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनी अमळनेर पोलीस निरीक्षकांना घटनेबाबत विचारणा केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने बच्चनसिंह यांनी पोलीस निरीक्षकांची कानउघाडणी केली. आरोपींना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले. तलाठी संघटनेच्या पदाधिका:यांना संशयितांना अटक करू असे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिका:यांनी सांगितले.