धरणगाव, जि.जळगाव : टाकरखेडा रोडवरील दत्त टेकडीजवळ झालेल्या दोन मोटारसायकलींच्या समोरासमोरील अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. सागर नाना पाटील (४०, धरणगाव) व मालखेडा येथील नाना तुकाराम भिल (४०) अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही मोटर सायकलींची टक्कर इतकी वेगात झाली की नाना भिल जागीच तर सागर पाटील हे जळगावी नेतांना मृत्युमुखी पडले.नाना तुकाराम भिल हे अमळनेरकडे जात होते. त्याच वेळी समोरुन अमळनेरकडून धरणगावी येणारे सागर नाना पाटील यांच्या मोटर सायकलची भिल यांच्या मोटारसायकलशी टक्कर झाली. त्यात नाना भिल यांना जबर मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले. सागर पाटील यांना उपचारार्थ जळगावी नेत असताना त्यांचाही मृत्यू झाला.
धरणगावात मोटारसायकलींची टक्कर : दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:54 IST