शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

मुलाचे जाऊळ देऊन परतणाºया आईला ट्रकने चिरडले

By admin | Updated: March 19, 2017 00:57 IST

महामार्गावर गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाजवळील घटना : दैव बलवत्तर म्हणून पती व दहा महिन्याचा मुलगा बचावला

जळगाव : रावेर तालुक्यातील बलवाडी येथे आपल्या दहा महिन्याच्या तान्हुल्याचे जाऊळ देऊन जळगावातील रामेश्वर कॉलनीतील घरी परत येत असताना राष्टÑीय महामार्गावर मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पूनम प्रशांत जैन (वय २४ रा.बलवाडी, ता.रावेर ह.मु.रामेश्वर कॉलनी, जळगाव) ही विवाहिता चिरडल्या गेल्याने जागीच ठार झाली तर पती प्रशांत सतीश जैन व त्यांचा दहा महिन्याचा मुलगा श्रेयस हे बालंबाल बचावले आहे. राष्टÑीय महामार्गावर गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाजवळ शनिवारी दुपारी पावणे दोन वाजता हा अपघात झाला.जैन इरिगेशनमध्ये नोकरीलायाबाबत सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, प्रशांत सतीश जैन हे पत्नी पूनम (वय २४) हे मुलगा श्रेयस याचे जाऊळ असल्याने त्याला घेऊन दोन दिवस आधी मुळ गाव बलवाडी, ता.रावेर येथे गेले होते. जैन हे बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीत कामाला आहेत.पूनम जैन यांचे सासर बलवाडी व माहेर जळगाव आहे. वडील राजू सैतवाल हे पोलन पेठेतील जैन ब्रदर्स येथे वाहनावर चालक म्हणून नोकरीला आहेत. रामेश्वर कॉलनीत ते परिवारासह राहतात. वरच्या मजल्यावर मुलगी पूनम व जावई हे दोघं मुलासह राहत होते. प्रशांत हे ड्युटीला गेल्यावर पूनम आईजवळच राहत होती. भाऊ हर्षल हा आठवी तर बहीण शुभांगी ही बारावीला आहे. हे सर्व जण एकाच ठिकाणी राहत होते. दोन वर्षापूर्वी पूनम व प्रशांतचे लग्न झाले होते. गावाकडे रोजगार नसल्याने प्रशांत हे जैन इरिगेशन या कंपनीत कामाला लागले होते. दोघांचा संसार अगदी आनंदात सुरु होता. त्यांच्या या संसारात श्रेयस रुपी वेल फुलली होती, त्यामुळे हा संसार अधिकच बहरला होता, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्यांच्याया संसाराला दृष्ट लागली. या अपघातात महिला ठार झाल्याचे लक्षात येताच चालक ट्रक घटनास्थळावरुन सोडून फरार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राहुल वाघ, वासुदेव मराठे, युनूस शेख, चंद्रकांत पाटील, चेतन पाटील, राजेंद्र साळुंखे व गुलाब माळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत महिलेला जिल्हा रुग्णालयात हलविले. क्रॉसबारला धडक        करंज येथील तरुण ठारशेतातील टोमॅटो मालवाहू रिक्षातून कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत असताना रिक्षाच्या टपावर बसलेला महेंद्र निंबा धनगर (वय २० रा.करंज, ता.जळगाव) हा तरुण शेतकरी शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या क्रॉसबारला धडक बसल्याने ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. साईडपट्टीच्या दिशेने फेकले गेल्याने पिता-पूत्र बचावलेशुक्रवारी जाऊळचा कार्यक्रम आटोपला. शनिवारी जैन यांची दुपारची  ड्युटी असल्याने ते  दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एन.१४७६) जळगावला येण्यासाठी निघाले. साकेगाव सोडल्यानंतर गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाजळ मागून भरधाव वेगाने येणाºया ट्रकने (क्र.एम.एच.४३ वाय ७७४०) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात पूनम या महामार्गाच्या दिशेने फेकल्या जाऊन ट्रकखाली सापडल्या. त्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या. तर मुलगा श्रेयस व पती प्रशांत हे साईडपट्टीच्या दिशेने फेकले गेले, त्यामुळे दोघं बाप-लेकांना खरचटलेही नाही. दैव बलवत्तर म्हणून दोघं सुखरुप राहिले.