शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

आई संस्कार रुजविते तर बाप संघर्ष, कष्ट, त्याग आणि समर्पण शिकवितो - प्रा.पंकज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 16:31 IST

आई संस्कार रुजविते, तर बाप संघर्ष, कष्ट, त्यात आणि समर्पण शिकवितो, असे जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व के.एस.गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.पंकज पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देजिजाऊंचे संस्कार सांगताना शहाजी राजेंनी दिलेले सामर्थ्यही विसरता येणार नाहीयुगपुरुष व भारतभूमीला स्वातंत्र्य देणाऱ्या महान योद्ध्यांना घडवण्यात जेवढी भूमिका मातेची आहे त्याहून श्रेयस्कर भूमिका ही त्यांच्या वडिलांचीइतिहासाने आपल्यासमोर केवळ मातेचे महत्त्व कथन केले आणि रणांगणावर झुंजणारा बाप मात्र दुर्लक्षितच राहिला

भुसावळ, जि.जळगाव : आई संस्कार रुजविते, तर बाप संघर्ष, कष्ट, त्यात आणि समर्पण शिकवितो, असे जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व के.एस.गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.पंकज पाटील यांनी सांगितले.भागवत झोपे यांच्या स्मरणार्थ चाललेल्या व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत हरी बढे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष नीळकंठ झोपे, सचिव प्रशांत पाटील, संचालक अतुल झांबरे, डॉ.भागवत पाटील, दिलीप झोपे, रमेश सरोदे, सुरेश पाटील, माजी सरपंच तुषार पाटील, चंद्रशेखर झोपे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.ए.वाघ आदी उपस्थित होते.जिजाऊंचे संस्कार सांगताना शहाजी राजेंनी दिलेले सामर्थ्यही विसरता कामा नये, हेही उदाहरण प्रा.पाटील यांनी दिले. आपल्या व्याख्यानातून अनेक मुद्यांना स्पर्श करीत वडिलांचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर कथन केले. युगपुरुष व भारतभूमीला स्वातंत्र्य देणाºया महान योद्ध्यांना घडवण्यात जेवढी भूमिका मातेची आहे त्याहून श्रेयस्कर भूमिका ही त्यांच्या वडिलांची आहे. परंतु इतिहासाने आपल्यासमोर केवळ मातेचे महत्त्व कथन केले आणि रणांगणावर झुंजणारा बाप मात्र दुर्लक्षितच राहिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना घडवणाºया रमाई सांगितल्या, गेल्या मात्र त्याच वेळी रामजी आंबेडकरांनी स्वत:च्या पोटाला चिमटा घेत प्रसंगी भुकेले राहून डॉ.आंबेडकरांना शिकविले, भीमरावांनी जेव्हा वडिलांना विचारले की, स्वत:ला माझ्याकरिता त्रास का करून घेत आहात? तेव्हा रामजी उत्तरले की, तुझ्या कर्तव्याच्या उंचीने माझी खरी भूक भागणार आहे. तेव्हा तो शिक्षणाकडे अधिक लक्ष दे. यशोदा आणि देवकीचे प्रेम आम्हाला पुराण कथांमधून सांगितले जाते मात्र प्राणाची बाजी लावत डोक्याबरोबर पाण्यातून कृष्णाला जीवदान देणारा वासुदेव मात्र दृष्टीच्या पल्याड जातो. आई म्हणजे दुधावरची साय असते, वासराची गाय असते आणि लंगड्याचा पाय असते. असे लेखक-कवी सांगत आले. मात्र बापाचं महत्त्व कथन करताना लेखणीला शाही कशी अपूर्ण पडते? असे का घडत आले? तर आजच्या शिक्षण व्यवस्थेने, इतिहासाने किंबहुना लेखक आणि कवी यांनीदेखील आम्हाला वेळोवेळी दर्शवली ती माय पण बाप बिचारा कर्तव्याच ओझे बिनशर्त वाहत राहिला, स्वत:च्या इच्छा आकांक्षा पायतळी तुडवत राहिला, त्याग, समर्पण हे जणू त्याच्या कपाळी गोंधळ गेलं आणि इतिहासाच्या पानातून ते आजच्या वर्तमानातदेखील तुमच्या-आमच्या उघड्या डोळ्यांनाही तो दिसलाच नाही, असे प्रा.पाटील यांनी सांगितले.तिसरे पुष्प सोमवारीबाप या विषयावर तिसरे पुष्प महात्मा गांधी विद्यालयात सकाळी आठ वाजता गुंफले जाणार आहे. यासाठी सेंट आलायसेस मराठी प्राथमिक शाळेचे शिक्षक जीवन महाजन मार्गदर्शन करतील.

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ