शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

भूलशास्त्र दिनानिमित्त प्रभातफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 12:39 IST

जळगाव : जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त जळगाव भूलशास्त्र संघटनेच्यावतीने प्रभातफेरी काढण्यात येऊन जनजागृती करण्यात आली. भाऊंचे उद्यानापासून प्रभातफेरीस सुरुवात होऊन ...

जळगाव : जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त जळगाव भूलशास्त्र संघटनेच्यावतीने प्रभातफेरी काढण्यात येऊन जनजागृती करण्यात आली.भाऊंचे उद्यानापासून प्रभातफेरीस सुरुवात होऊन गांधी उद्यान येथे समारोप झाला. या ठिकाणी सभा होऊन नागरिकांना माहितीपत्रके वितरीत करण्यात आली. विविध संदेश देणारे माहितीफलक डॉक्टरांचे हाती होते.भूलशास्त्राविषयी असलेले गैरसमज दूर करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वेदनारहित प्रसूती, जीवनरक्षक प्रणाली, बंद हृदय पुनर्जीवित करण्याची प्रक्रिया, शस्त्रस्क्रिये आधी काय काळजी घ्यावी, या विषयीची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. सोबतच भूल देते वेळी वापरण्यात येणारी उपकरणे दाखवून त्यांची माहिती देण्यात आली.प्रमुख अतिथी आयएमएचे सचिव डॉ.धर्मेंद्र पाटील होते. त्यांनी भूलशास्त्र हे वैद्यकीय क्षेत्राला मिळालेले वरदान आहे आणि भूलशास्त्र तज्ज्ञ हे यशस्वी शस्त्रक्रियेच्या पडद्यामागील हिरो आहेत, असे नमूद केले.यावेळी महाराष्ट्र भूलतज्ज्ञ संघटनेचे सदस्य डॉ.नरेंद्र ठाकूर, जळगाव भूलशास्त्र तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया पाचपांडे, सचिव डॉ. धिरज चोधरी, डॉ.हरणखेडकर, डॉ.नितिन महाजन, अमित हिवरकर, डॉ .पंकज बढे, डॉ .लीना पाटील, डॉ वर्षा कुलकर्णी, डॉ. सोनाली महाजन, डॉ. पूजा बढ, डॉ. ललित पाटील, डॉ. अतुल पाटील, डॉ. अरुण पाटील, डॉ. विनोद किनगे, डॉ. जयश्री राणे, डॉ. आरती पाटील, डॉ. गणेश भारुड, डॉ. विभा महाजन, डॉ. साठे, डॉ. रोहिणी चोधरी, डॉ. नितिन खडसे, डॉ. नीला पाटील, डॉ प्राजक्ता जावळे, डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. विलास भोळ, डॉ. अनिता भोळे, डॉ. तिलोत्तमा गाजरे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी. डॉ.प्रियांका पाटील, डॉ सुवर्णा जोशी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. धीरज चौधरी यांनी केले.बालरोग तज्ज्ञ संघटनेच्यावतीने रविवारी मार्गदर्शनजळगाव : मुलांची बदलणारी मानसिकता व पालकत्व या विषयी माहिती देण्यासाठी जळगाव बालरोग तज्ज्ञ संघटनेच्यावतीने रविवार, २० आॅक्टोबर रोजी ‘बदलणारे पालकत्व काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आयएमए हॉल येथे संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून यामध्ये बाल संगोपन, मुलांच्या मानसिक आजाराचे तज्ज्ञ डॉ. सुचित तांबोळी हे मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थितीचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय शास्त्री यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव