शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

आरक्षण व भाषेचे स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:04 IST

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शहा यांनी नुकतीच बांगला देशात भेट दिली. भेटीवर आधारित प्रवास वर्णनात्मक लेखमालेचा आठवा भाग ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत...

बांगला देशातील आमचा हा प्रवास खूप पूर्वनियोजन न करता केला. जिथली भाषा मला अजिबात येत नाही अशा अगदी अनोळखी प्रदेशात गेलो होतो, तेही एकटा. मात्र सोबत होते ते तिथले लोक. या सगळ्यात बांगला देशातल्या रोटरीच्या सभासदांची मदत झाली हे आवर्जून नमूद करायला हवे.सर्व देशभर विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात संघर्षाचे खटके उडत होते. सरकारने एका मंत्रिमहोदयांना विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घ्यायला पाठवले. ‘सरकार तुमच्या विरोधात नाही आणि तुमच्या मागणीतील सत्यता मान्य करते आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याविषयी धोरण जाहीर करू’, असे त्यांनी आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी ते मान्य करून बहिष्कार मागे घेतला. पण दरम्यान दुसऱ्या दोन मंत्र्यांनी काहीतरी उलटसुलट बोलून उचापत करून ठेवली. (याची लागण मात्र सगळीकडे सारखीच!). विद्यार्थी पुन्हा भडकले. सगळ्या वृत्तमाध्यमातून विद्यार्थी आणि प्रशासन यांचे खटके आणि संघर्ष जोरात दिसू लागला. देशभर रास्ता रोकोने कळस गाठला. शेवटी १२ एप्रिल २०१८ ला पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातील सरकारी नोकºयातील आरक्षण-कोटा पद्धत सरसकट बंद करण्याची घोषणा केली.लोकांना या आरक्षण आणि कोटा पद्धत रद्द केल्याबद्दल काय वाटते याची भेटलेल्यांकडे चौकशी केली. ड्रायव्हर ते व्यापारी अशा पाच-सहा प्रकारच्या लोकांना तोच प्रश्न विचारला. सगळ्यांचे एकजात उत्तर होते ‘उत्तम झाले’. त्याचे काही उलट सुलट परिणाम होतील हेदेखील सगळेच सांगत होते. पण कुणीही त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. आता तेथे फक्त अपंगांसाठीचे आरक्षण आहे. पंतप्रधान शेख हसीना लोकांना म्हणतात, ‘भरपूर मेहनत करा आणि भरपूर पैसे कमवा. सरकारच्या भरवशावर सगळे होऊ शकत नाही.’आपल्या शेजारच्या छोट्याशा देशाने मोठा आदर्श घालून दिला. माझ्या राकट आणि कणखर देशाला हे केव्हा कळेल? आपल्या देशात तर एका पिढीच्या डोळ्यादेखत ‘माझी जमात किती श्रेष्ठ’पासून आता ‘माझी जमात किती मागासलेली’ हे पटवून देण्याची धडपड चालणे, अगदी घुमजाव म्हणता येईल इतके स्थित्यंतर आपण एका पिढीच्या वयातच पाहतो आहोत.ढाक्का शेजारील नारायणगंजजवळच्या अगदी छोट्या फटूल्लाह गावात एक साधारण साठीचे गृहस्थ भेटले. रस्त्यात नवीन माणसे गावात दिसली आणि भारतातून आलोय असे दिसल्यावर ते जवळ आले आणि उत्साहात बोलत थांबले. आपल्याकडेही सगळ्या लहान गावात माणसे अशीच मोकळी-ढाकळी असतात आणि बोलताना त्यांच्यात कोणताही संकोच आणि कृत्रिमपणा नसतो. दुसºया दिवशी ते ‘उमराह’साठी मक्केला जाणार होते. इस्लामिक कॅलेंडरप्रमाणे त्यातला शेवटचा महिना आणि त्यातले आठवा ते बारावा दिवस यादरम्यान मक्केची यात्रा म्हणजे ‘हज’ची यात्रा. इतर कोणत्याही वेळी केलेली यात्रा म्हणजे ‘उमराह’.मी त्या ‘उमराह’ला जाणाºया बाबांना विचारले, सरकार तुम्हाला ‘हज’साठी काही मदत करते का? माझ्या प्रश्नाने त्यांच्या चेहºयावर ‘असा काय चमत्कारिक प्रश्न विचारता?’ असे भाव उमटले. मी विचारले, माझा प्रश्न काही चुकला काय किंवा मी नीट विचारले नाही काय? कारण भाषेचा अडसर मला सतावत होताच.त्यावर त्यांचा पटकन प्रतिप्रश्न होता, ‘अहो यात्रा मी करणार, त्यासाठी सरकार कशी काय मदत करणार?’ त्यांना माझी कीव आली असावी हे दिसतच होते. माझ्या डोक्यात मात्र त्यांच्या प्रतिप्रश्नाने काहूर उठवले.ढाक्का शहरात फिरताना १ फेब्रुवारी २०१९ ला ढाक्का विद्यापीठाच्या परिसरात पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते एका राष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्याच विद्यापीठ परिसरात एक सुंदर मोठा चौक आहे. तेथे खूप तरुण जमलेले दिसले. एका व्यासपीठावर काही तरुण गाणी म्हणत होते. तेथे मी थांबलो. मी काय सुरू आहे याची चौकशी केली. त्यावर माझ्यासोबत होते. त्यांनी सांगितले की, हा चौक आणि तेथे केलेले बांधकाम हे ‘बांगला भाषेचे राष्ट्रीय स्मारक’ आहे, ‘शहीद मिनार’. (बंउ ‘शोहीद’ मिनार) तेथे पुष्पचक्रे वाहिलेली होती. ‘भाषेचे राष्ट्रीय स्मारक’ या शब्दांनी माझी उत्सुकता चाळवली. (क्रमश:)-सी.ए. अनिलकुमार शहा, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव