फोटो
कल्पेश महाजन
धरणगाव : बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी ज्या भूमीत जन्म घेतला त्या भूमित साकारले जाणारे बालकवींचे स्मारक गेल्या काही वर्षांपासून निधीअभावी रखडले आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात नाराजीचा सूर उमटत आहे.
आज १३ ऑगस्ट, बालकवीची जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने तरी कामाल गती यावी, अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
१३ ऑगस्ट १८९० मध्ये धरणगावला जन्मलेल्या बालकवींची काव्य प्रतिभा याच भूमित फुलली. तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सन २०१०-११ मध्ये बालकवींच्या स्मारकाची मुहूर्तमेढ रोवली होती.
स्मारकाच्या संरक्षक भिंतीसाठी ५५ लाख निधी जिल्हा नियोजन मंडळातर्फे मंजूर करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्मारकाचा आराखडा तयार करून सन २०१२- १३ मध्ये पुढील कामासाठी ५ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता.या स्मारकाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
या स्मारकासाठी बांधलेले गेट देखील चोरीला गेले आहे. निसर्ग कवी बालकवींचे स्मारक साकारले गेल्यास ते साहित्यिकांची ‘पंढरी’ म्हणून नावारूपाला येईल. येथे विविध साहित्यिक उपक्रम राबविले जातील. स्मारकाशिवाय कवितांची कार्यशाळा, बालकवी साहित्य संशोधन केंद्र, आदी उपक्रम सुरू होणार नाही.
चौकट
बाजार समितीच्या बाजूला असलेल्या औदुंबराचे झाडदेखील जमीनदोस्त झालेले आहे याबद्दलही साहित्य क्षेत्रात नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोट
बालकवी स्मारकासाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. तो मंजूर होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कोविडमुळे निधीची कमी होती. आता
निधी मिळेल आणि खान्देशासाठी बालकवींचे वैभवशाली स्मारक बनवू. - गुलाबराव पाटील, पालकमंत्री.