शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जळगाव शहरातून जाणा-या महामार्गाच्या समांतर रस्त्यांसाठी सोमवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 12:22 IST

जिल्हाधिकारी

ठळक मुद्दे चौपदरीकरण 15 दिवसात सुरु होणारमे 2019 र्पयत चौपदरीकरण होणार पूर्ण

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 07- शहरातून जाणा:या महामार्गावर दररोज अपघात होऊन अनेकांचे बळी जात आहे. या ज्वलंत विषयामुळे शहरवासीय आक्रमक असून समांतर रस्त्यासाठी 100 कोटींचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरु आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत नियोजनासाठी ‘नही’ व संबंधित कंपनीच्या अधिका:यांची बैठक घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शनिवारी दिली.  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातंर्गत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित ‘सिध्दी 2017 व संकल्प 2018’ या उपक्रमातंर्गत पत्रकार दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी येत्या वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात येणा:या विविध उपक्रमांची माहिती दिली. या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके आदी उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकार दिनानिमित्ताने उपस्थित सर्व पत्रकारांचा जिल्हाधिका:यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या वेळी जिल्हाधिकारी  निंबाळकर यांनी राज्य शासनाच्यावतीने जिल्ह्यात गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या व या वर्षात करण्यात येणा:या विविध विकास कामांची माहिती दिली.

 गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळत असलेल्या तसेच जळगाव शहरवासीयांसाठी आणि जिल्हावायीयांचा जिव्हाळ्य़ाचा विषय ठरत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले की, चिखली ते तरसोद या 62. 700   किमी लांबीच्या रस्त्यासाठी 86 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी संबंधितास काम करण्यासाठी मुरुम खोदण्याची परवानगीही देण्यात आली असून येत्या 15 दिवसांत कामास सुरुवात होणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. 

मे 2019 र्पयत चौपदरीकरण होणार पूर्णयापुढे असलेल्या तरसोद ते फागणे या 87.300 कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी 99 टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून या एकूण 150 कि.मी. लांबीसाठी 1888 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे  ते म्हणाले. पाळधी ते फागणे या दरम्यानच्या रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरु मे 2019  पयर्ंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याचे ते म्हणाले. 

100 कोटींच्या निधीतील कामांसाठी डीपीआरसमांतर रस्त्यांअभावी जळगाव शहरातून जाणा:या महामार्गावर दररोज अपघात होऊन अनेकांचे बळी जात आहे. या ज्वलंत विषयामुळे शहरवासीय आक्रमक असून समांतर रस्त्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, या निधीतून नशिराबाद ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठार्पयतच्या समांतर रस्त्यांसाठी प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी प्रारुप आराखडा तयार करण्याचे कामही सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. 

समांतर रस्त्यांसदर्भात 8 जानेवारी रोजी बैठकशहरवासीयांच्या जीवन-मरणाचा विषय ठरत असलेल्या समांतर रस्त्याबाबत सोमवार, 8 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. यासाठी मंजूर झालेल्या 100 कोटींच्या कामातील डीपीआर तयार करण्यासाठी कंपनीला काम देण्यात येणार आहे. यासंदर्भात 8 जानेवारी रोजी जिल्हाधिका:यांसोबत ‘नही’चे अधिकारी अरविंद काळे तसेच संबंधित कंपनीच्या अधिका:यांची बैठक होणार आहे. 

अजिंठा चौफुलीचे काम येत्या 15 दिवसात सुरु करणारराष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव शहरात असलेल्या अजिंठा चौफुलीवर रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते. तसेच वारंवार अपघातही होत असतात. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजिंठा चौफुलीचे काम येत्या 15 दिवसात सुरु करणार असल्याचेही जिल्हाधिका:यांनी सांगितले. या सोबतच अजिंठा चौफुली ते औरंगाबाद रस्त्याचेही काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पिंप्राळा व शिवाजीनगर येथे उड्डाणपूल प्रस्तावित  जळगावातील पिंप्राळा व शिवाजीनगर येथे तसेच आसोदा, भादली येथे उड्डाणपूल तर  भुसावळ येथे भुयारी पुलाचे बांधकाम करणे, रावेर, पातोंडी,  पिंप्रीनांदू, डोलारखेडा, रस्त्यावर रावेर स्टेशनजवळ उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्तावित असल्याचेही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

धुळे - औरंगाबाद रस्त्याच्या कामास लवकरच सुरुवातधुळे-चाळीसगाव-औरंगाबाद रस्त्याच्या कामाचे भूसंपादन पूर्ण झाले असून त्याच्या कामाला लवकरच कामास सुरुवात होणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील 8330  कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या देखभाल व  दुरुस्तीसाठी  2016-17मध्ये 11.09  कोटी तर 2017-18मध्ये 13.21   कोटी रुपये निधी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

‘मुख्यमंत्री ग्रामसडक’ने 163 गावे जोडली जाणार 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात 254 कि.मी. लांबीची 133 कोटी रुपये खर्चाची 40 कामे सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील 163 गावे जोडली जाणार आहे. यापैकी 11 कामे पूर्ण झाली आहे तर 25 कामे प्रगतीपथावर असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. 

महत्त्वाच्या घोषणा..- हिरापूर ते न्यायडोंगरी उड्डाणपूल-  एरंडोल - नेरी- जामनेर मार्गावर म्हसावद गावाजवळ उड्डाणपूल- औरंगाबाद- पहूर - मुक्ताईनगर रस्त्यावर बोदवड येथे उड्डाणपूल- सावखेडा फाटा - धरणगाव - एरंडोल रस्त्यावर उड्डाणपूल-  धुळे - अमळनेर - चोपडा रस्त्यावर उडाणपूल- खिरोदा - चिनावल - वडगाव -बलवाडी- हतनूर रस्त्यावर निंभोरा येथे उड्डाणपूल-  कजगाव - तरवाडे - टेकवाड - पारोळा रस्त्यावर कजगावजवळ उड्डाणपूल-  सावदा ते सावदा रेल्वे स्टेशन - उदळी - हतनूर रस्त्यावर उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली आहे.