अमळनेर तालुक्यातील निम येथील २८ वर्षीय महिला १३ रोजी रात्री १० वाजता कपिलेश्वर रस्त्याकडे शौचास गेली असता, शेजारी राहणाऱ्या सुनील शिवाजी पाटील याने तिला आवाज देऊन विनयभंग केला. त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर दुसऱ्या दिवशी १४ रोजी सकाळी ७ वाजता पती समाधान संतोष कोळी हे नाश्ता करून मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी कामासाठी निघून गेले. त्यानंतर ती सकाळी ११ वाजता घरासमोर भांडे घासत असताना सुनील पाटील याने पुन्हा तिची छेड काढायचा प्रयत्न केला. ती एकटीच असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष करून पटकन भांडे आवरुन घाबरुन घरात निघून गेली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा ५ वाजताच्या सुमारास घरी एकटी असताना त्याने पुन्हा तिची छेड काढली. याप्रकरणी महिलेने मारवाड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.
निम येथे महिलेचा विनयभंग; आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:20 IST