धुळे : पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून खासगी सेवा करणार्या महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नवनाथनगरमध्ये राहणार्या महिला डॉक्टर त्यांच्या अजमेरानगरातील नॅशनल उर्दू हायस्कूलजवळ असलेल्या खासगी रुग्णालयात उपस्थित असताना जयवंत वानखेडकर याने रुग्णालयात जाऊन त्यांच्या पतीकडे दोन लाख ३५ हजारांची मागणी केली. उसनवारीच्या पैशातून उभयतांमध्ये वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर वानखेडकरने महिला डॉक्टरचा विनयभंग करून त्यांच्या पतीला धमकावले. ही घटना २५ एप्रिल २०१४ रोजी सायंकाळी साडेसातला घडली होती. याप्रकरणी महिला डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जयवंत वानखेडकर याच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खासगी रुग्णालयात महिला डॉक्टरचा विनयभंग
By admin | Updated: May 20, 2014 01:25 IST