शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोहन नगरात चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 12:56 IST

महाबळ कॉलनी व मोहाडी रस्त्याला लागून असलेल्या मोहन नगरात गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरांची टेहाळणी करुन त्याच घरांना टार्गेट केले जात आहे

ठळक मुद्दे घर मालक पुण्याला बंद घरांची टेहाळणीगस्त वाढविण्याची अपेक्षा

आॅनलाईन लोकमत

जळगाव दि,१०,महाबळ कॉलनी व मोहाडी रस्त्याला लागून असलेल्या मोहन नगरात गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरांची टेहाळणी करुन त्याच घरांना टार्गेट केले जात आहे. महिनाभरात सात ते आठ घटना घडल्या आहेत. तक्रारदारालाच फिरविण्यात येत असल्याने अनेकांना पोलिसात तक्रार देण्याचे टाळले आहे.गेल्या महिन्यात २४ आॅगस्ट रोजी आनंद नगरात स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला शोभा हिरामण पाटील यांच्या बंद घराचे टॉमीने कुलूप तोडून चोरट्यांनी आठ ते दहा हजार रुपयांची रोकड लांबविली होती.पाटील यांच्या घराशेजारीही एका बंद घराचे कुलूप तोडण्यात आले होते. त्यातील कोणतीही वस्तू चोरी झालेली नव्हती. आता दोन दिवसापूर्वीही मोहन नगरात एका घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात चोरी केली आहे. घर मालक पुण्याला असल्याने हे घर बंद होते. घरात चोरी झाल्याचे समजल्याने रविवारी ते पुण्याहून घरी आले. तक्रार करुनही उपयोग नाही, उलट पोलीस ठाण्याच्या चकरा होतात असे म्हणत त्यांनी तक्रार देण्याचे टाळले आहे. या गल्लीत आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. गस्त वाढविण्याची अपेक्षाआनंद नगर व मोहन नगर हा परिसर रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. शेजारी मोहाडी रोड, नेहरु नगर हा परिसर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या परिसरात गस्त होत नसल्याच्या तक्रारी आहेत.