शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

हरभरा पिकाचे आधुनिक पद्धतीने उत्पादन

By ram.jadhav | Updated: November 1, 2017 00:42 IST

रब्बी हंगामातील महत्त्वाच्या पिकातील हरभरा हे कडधान्य पीक बागायतीसह कोरडवाहू क्षेत्रातीलही शेतकºयांसाठी उत्पन्नाचे चांगले साधन आहे़

ठळक मुद्देसुधारित वाणांची निवड करावीबीजप्रक्रिया गरजेचीचजमिनीची निवड

राम जाधवआॅनलाईन लोकमत दि़ १ जळगाव : रब्बी हंगामातील महत्त्वाच्या पिकातील हरभरा हे कडधान्य पीक बागायतीसह कोरडवाहू क्षेत्रातीलही शेतकºयांसाठी उत्पन्नाचे चांगले साधन आहे़ हरभरा डाळीचे मानवी आहारातही अनन्यसाधारण महत्त्व आहे़ या पिकातही आधुनिक पद्धतीचा वापर करून विक्रमी उत्पादन घेता येते़ यावर्षी पाण्याचे प्रमाण कमी असल्याने रब्बी हंगामात शेतकºयांना हरभरा पिकाचे उत्पादन एक चांगला पर्याय आहे़पेरणीची वेळ महत्त्वाचीकोरडवाहू क्षेत्रामध्ये जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वीच हरभºयाची लागवड करावी़ तर बागायती हरभरा २० आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन मिळते़ डिसेंबरनंतर पेरणी केल्यास उत्पादन कमी येते़ काबुली हरभºयाची पेरणी सिंचनाची सोय असेल तर करावी, अन्यथा उत्पादनात मोठी घट येते़चांगल्या उत्पादनासाठी सुधारित वाणांची निवड करावी़ बाजारात विजय, दिग्विजय, जॅकी, विराट, विशाल, पीक़े़ व्ही़-२, ४, कृपा अशी अनेक प्रकारचे सुधारित बियाण्यांचे वाण उपलब्ध आहेत़ ही वाण मर रोगाला प्रतिकारकक्षम असतात, तर खते व पाण्याचा वापर केल्यास उत्पादनात चांगला प्रतिसादही देतात़हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या निचºयाची जमीन निवडावी़ हलकी अथवा बरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये़ दोन ओळीतील अंतर ३० सें़मी़ व दोन रोपातील १० सें़मी़ अंतरावर टोकन पद्धतीने लागवड करावी़ हेक्टरी ७० ते १०० किलो हरभºयाचे बियाणे पडायला हवे़पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास २ गॅ्रम थायरम, २ गॅ्रम बाविस्टीन किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा यांची बीजप्रक्रिया करावी़ यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम प्रती १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे व तासभर सुकवून मग पेरावे़ यामुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते़ तसेच मुळावरील नत्रांच्या ग्रंथी वाढून पिकांची वाढ चांगली होते़खतांची मात्रापेरणीवेळी हरभºयाला एकरी ५० किलो डीएपी आणि २० किलो पोटॅश द्यावे़ पीक फुलोºयात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये २ टक्के युरियाची फवारणी करावी़ वेळोवेळी कोळपणी व खुरपणी करावी़ ज्यामुळे पीक तणविरहीत राहून चांगले उत्पादन मिळेल़ पेरणीच्यावेळी वापशावर फ्ल्युक्लोरॅलिन हे तणनाशक गरजेनुसार वापरता येईल़हरभरा पिकास पाणी मर्यादेतच दिले जावे़ यातही तुषार सिंचनाचा सुरुवातीपासूनचा केल्यास जमीन कायम वाफसा अवस्थेत राहत असल्याने उत्पादनात चांगली वाढ होते़ तसेच तणही जास्त वाढत नाही व मुळकुज रोगही लागत नाही़ हरभºयावरील घाटेअळी या प्रमुख किडीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या तिसºया आठवड्यापासून निंबोळी अर्क, रासायनिक कीडनाशकांचा वापर करता येईल़ तसेच पक्षी थांबे व कामगंध सापळे लावूनही एकात्मिक पद्धतीने या अळींचे चांगले नियत्रंण करावे़