शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांची मनोवृत्ती संकुचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 00:43 IST

सुनील महाजन यांची टीका : २५ कोटींचे खरे श्रेय जलसंपदामंत्र्यांचे

जळगाव : शहरासाठी २५ कोटींचा निधी आणण्याचे श्रेय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे असून त्यासाठी महापौरांनी नियमितपणे पाठपुरावा केला आहे. आमदार सुरेश भोळे यांनी फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. याउलट आमदार भोळे यांची मनोवृत्ती संकुचित असून त्यांनी या निधीतील कामे ठरविण्यासाठीच्या समितीत मनपातील त्यांच्या विरोधी पक्षनेता अथवा गटनेत्याला सुद्धा स्थान न देऊन स्वपक्षाच्या सदस्यांवरच अविश्वास दर्शविला असल्याची टीका माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत केली.महाजन यांनी सांगितले की, गेल्या २ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री जिल्हा दौºयावर आलेले असताना स्थानिक भाजपा नगरसेवकांसह तत्कालीन महापौरांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शहरासाठी निधीची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी २५ कोटींचा निधी शहरासाठी देण्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून दीड दोन वर्षात आमदार सुरेश भोळे यांनी या निधीसाठी किती पाठपुरावा केला? हा संशोधनाचा विषय आहे.  याउलट महापौरांनी मनपाचे जिल्हाधिकाºयांनी परस्पर वळते केलेले १० कोटी जलसंपदामंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करून परत आणले. गेल्या १ वर्षापासून महापौरांनी मुंबईला मंत्रालयात जाऊन जलसंपदामंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तसेच वेळोवेळी आवश्यक ठराव, प्रस्ताव देऊन या २५ कोटींच्या निधीचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच आॅगस्ट २०१६ मध्ये शासनाने मनपाला पत्र देऊन अर्थसंकल्पात या २५ कोटींची तरतूद केल्याचे पत्र                 दिले. ...तर महत्त्वाचे प्रश्न सोडवाआमदार भोळे यांना शहर विकासाचा खरच पुळका असेल तर त्यांनी शहरातील समांतर रस्ते, मार्केट गाळे करार, शिवाजीनगर व पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल आदी ज्वलंत प्रश्न सोडवावेत. १८ मार्केटचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन तर आमदारांनी निवडणूक जाहीरनाम्यातच दिले होते. मात्र अडीच वर्ष उलटूनही हा प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही. त्याचा पाठपुरावा त्यांनी करावा. न केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नये. बजरंग बोगद्याच्या कामासाठीही आमदार, खासदारांनी कोणताही पत्रव्यवहार केला नाही.मनपाने त्यासाठी पाठपुरावा केला. तसेच पावणेचार कोटींचा निधीही रेल्वेला दिला. मात्र            त्याचेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न आमदारांनी केल्याची टीका महाजन यांनी केली. शासनाने शहर विकासाच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी दिला आहे. मात्र त्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला नाही. तर आमदार भोळे यांनी वारंवार केलेल्या तक्रारींमुळे ही समिती नेमली आहे. शहरातील कामे या निधीतून करावयाची असताना त्यात मनपाचा एकही प्रतिनिधी घेतलेला            नाही. आमच्यावर विश्वास नसेल तर समजू शकतो. मात्र भाजपाचे मनपातील विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक वामनराव खडके किंवा गटनेते सुनील माळी यांना तरी समितीत घ्यायला हवे होते. मात्र आमदारांनी त्यांच्यावरही अविश्वास दाखविला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपाचे मिशन ५० प्लस ऐवजी मिशन १५ प्लस तर नाही ना? अशी शंका येते, अशी टीका त्यांनी केली.