शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल सिम व्हेरिफिकेशनचा मेसेज ठरू शकतो तुमच्यासाठी धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

मोबाइल सिम व्हेरिफिकेशनचा मेसेज ठरू शकतो तुमच्यासाठी धोका ! सावधान : क्षणात तुमचे बॅंक खाते होईल रिकामे जळगाव : ...

मोबाइल सिम व्हेरिफिकेशनचा मेसेज ठरू शकतो तुमच्यासाठी धोका !

सावधान : क्षणात तुमचे बॅंक खाते होईल रिकामे

जळगाव : मोबाइल सिम व्हेरिफिकेशन करायचे आहे, असा मेसेज किंवा कॉल आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. काही क्षणातच आपले बँक खाते रिकामे होण्यासह वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती जाऊ शकते. त्यासाठी अशा मेसेज व काॅल्सला प्रतिसाद देऊ नये, सावधानता बाळगावी.

जळगाव जिल्ह्यात दोन वर्षांत या प्रकारचे १२४ गुन्हे घडले असून, सायबर पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

अलीकडे सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवीन फंडा शोधून काढला आहे. सिम व्हेरिफिकेशनच्या नावाखाली अनेकांना मेसेज अथवा कॉल करून भामट्यांकडून फसविले जात आहे.

तंत्रज्ञान बदलत चाललेले आहे. पोस्टमनची जागा आता मोबाइल फोनने घेतली आहे. प्रत्यक्ष भेटीऐवजी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून थेट लाइव्ह संवाद होऊ लागला. तसा मोबाइलचा वाढता वापर हा विविध प्रकारच्या धोक्यांनाही निमंत्रण देणारा ठरतो. स्मार्टफोनचा वापरही अत्यंत स्मार्ट पद्धतीनेच करायला हवा. कुठलेही मोबाइल ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी पडताळणी करण्यावरही भर द्यायला हवा, जेणेकरून आपल्या मूळ माहितीची स्मार्ट पद्धतीने सायबर गुन्हेगारांकडून चोरी होण्याचा धोका टळेल. अलीकडे मोबाइलधारकांपैकी काही कंपन्यांच्या ठरावीक नावाने बहुतांश ग्राहकांना सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग असा मेसेज पाठविला जात आहे. हा मेसेज टेक्स्ट स्वरूपात मोबाइलमध्ये येऊन धडकतो किंवा काही फेक कॉलदेखील केले जात आहेत. त्यामार्फत ग्राहकाची मूळ माहिती संबंधितांकडून जाणून घेतली जात असून, त्या माहितीच्या आधारे आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे.

लोकेशन, फोटो पाठवू नका

कोणतेही ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची निर्मिती कोणी केली आहे, त्याची पडताळणी करून घ्यावी. सायबर गुन्हेगारीमधील हॅकर्स यांनी काही बँक बॅलन्सच्या नावानेसुध्दा ॲप उपलब्ध करून दिलेले आहे. ॲप्लिकेशन डाऊनलोड करताना कुठल्याही प्रकारची माहिती लोकेशन, फोटो, व्हिडिओ याच्या परवानग्या देऊ नये.

कॉलवर बोलताना मातृभाषेचा वापर करा

सिम व्हेरिफिकेशन पेंडिंगबाबतचा कॉल किंवा मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. कॉलवर बोलताना मातृभाषेचाच वापर करावा, जेणेकरून संवाद वाढण्याऐवजी तुटेल.

सिमकार्ड ब्लॉक होण्याचा धोका टाळण्याकरिता संबंधित हॅकर्सकडून आधार कार्ड, पॅनकार्ड यासारख्या मूळ कागदपत्रांची मागणी होऊ शकते. अशावेळी कुठल्याही प्रकारची माहिती देऊ नये, आपला आधार क्रमांक किंवा पॅनकार्ड क्रमांक सांगू नये.

असा होतो डेटा चोरी

हॅकर्सकडून माहिती घेण्यासाठी फेक अर्ज तयार करून सोशल मीडियावरून व्हायरल करत ऑनलाइन पद्धतीने माहितीची चोरी केली जाते तसेच मेसेजवर क्लिक केल्यानंतर आपोआप एखादे ॲप्लिकेशन डाऊनलोड होण्यास सुरुवात होते आणि डेटा चोरी केला जातो.

अशी घ्या काळजी

आपल्या मूळ कागदपत्रांची माहिती कोणालाही सांगू नका. हॅकर्सच्या कॉलवर आपल्या मातृभाषेत संवाद साधा, ओटीपीची विचारणा होऊन रकमेची मागणी सिम ब्लॉक होऊ नये म्हणून केली जाऊ शकते, याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे. ऑनलाइन शॉपिंग करताना क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड वेबसाइट, ॲपवर सेव्ह करून ठेवू नये. मोबाइलवर ऑनलाइन कामकाज करताना पुरेशी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असून, मोबाइल जितका फायद्याचा तितकाच तोट्याचादेखील आहे.