शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत झाडू मारुन मोबाईलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:28 IST

२०० मोबाईल लांबविले

ठळक मुद्देगुन्हेगारास अटक

जळगाव : कोपरगाव ते भुसावळ या दरम्यान एक्सप्रेस गाड्यांमध्ये झाडू मारण्याचा बहाणा करुन मोबाईल व पाकीट मारणाऱ्या गणेश नारायण काळे (वय २०, रा.जवळका, ता. कोपरगाव, जि.अहमदनगर, मुळ रा. सैलानी, जि.बुलडाणा) या अट्टल गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी कोपरगाव येथून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. त्याने आतापर्यंत दोनशेच्यावर मोबाईल लांबविले आहेत.रामानंद नगर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेश याला अटक केली आहे. अजय अशोक देशमुख (वय ३०, रा.शिवकॉलनी) या तरुणाचा ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल, ८०० रुपये रोख व एटीएम कार्ड ३ आॅगस्ट २०१८ रोजी घरातून लांबविण्यात आले होते.या गुन्ह्याचा तपास सुरु असताना हा मोबाईल कोपरगाव येथे गणेश काळे याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांना स्वतंत्र पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रोहोम यांनी हेडकॉन्स्टेबल अनिल इंगळे, रमेश चौधरी, संतोष मायकल, मिलिंद सोनवणे यांचे एक तर विजय शामराव पाटील, प्रवीण हिवराळे, विजय पाटील, चंद्रकांत पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर व रवींद्र गिरासे यांचे दुसरे पथक तयार केले होते.१४ वर्षाचा असताना पहिली चोरीगणेश याच्याविरुध्द जळगाव शहर, रामानंद नगर, नाशिक, जिल्हा पेठ, भुसावळ येथे सात मोबाईल व सोने चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सात वर्षापूर्वी रमेश चौधरी यांनीच त्याला भुसावळ येथे पकडले होते. तेव्हा त्याच्याविरुध्द पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो सराईत गुन्हेगार झाला. जळगावमध्येच त्याच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. रेल्वेत मोबाईल व पैसे वगळता तो इतर कोणतीच वस्तू चोरत नाही, हे त्याचे खास वैशिष्टे आहे.पोलीस स्टेशनमधून पळाल्याने दोन पोलीस निलंबितगणेश काळे याला २०१६ मध्ये मध्यरात्री चोरी करताना विद्युत कॉलनीतील लोकांनी रंगेहाथ पकडले होते. तेव्हा इमारतीवरुन उडी घेऊन तो पसार झाला होता, मात्र पाठलाग करुन लोंकानी त्याला पकडलेच होते. त्यानंतर रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तेव्हा पोलिसांची नजर चुकवून तो पहाटेच्या सुमारास पळून गेला होता. या प्रकारामुळे तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांना निलंबित केले होते.अटक झाल्याने पत्नीने सोडलेभुसावळ येथे चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्यामुळे पत्नीने त्याला सोडून दुसºयाशी संसार थाटला होता. आता त्याने कोपरगाव येथे नात्यातीलच मुलीशी विवाह केला आहे. पोलिसांनी त्याला रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले तेव्हा पत्नीने गोंधळ घालून त्याला घेऊन जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने तिला न जुमानता थेट जळगावात आणले.

टॅग्स :Thiefचोर