शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे पोलिसांच्या दक्षतेमुळे महिलेला मिळाला हरविलेला मोबाइल व पर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 17:08 IST

भुसावळ तालुक्यातील खडका गावातील अनिल वारके यांची आई भुसावळला बाजार करण्यासाठी आली असता त्या महिलेचा मोबाइल व पर्स हरविल्याची घटना सकाळी घडली. यानंतर पोलीस कर्मचारी तस्लीम पठाण यांच्या जागरुकतेमुळे ते संबंधितांना परत मिळाले.

ठळक मुद्देमहिला खडका येथून भुसावळ येथे आली होती बाजार करण्यासाठीअचानक हरवला मोबाइल व पर्स

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील खडका गावातील अनिल वारके यांची आई भुसावळला बाजार करण्यासाठी आली असता त्या महिलेचा मोबाइल व पर्स हरविल्याची घटना सकाळी घडली. यानंतर पोलीस कर्मचारी तस्लीम पठाण यांच्या जागरुकतेमुळे ते संबंधितांना परत मिळाले.रविवारचा बाजार भुसावळात भरत असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक बाजारासाठी येतात. यामुळे बाजारात चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे. मोबाइल चोरीचे सत्र हे दर रविवारी सुरूच असते. कित्येकांचे मोबाइल चोरीला जातात. या चोरट्यांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. ही मुले इतक्या हुशारीने बाजारात येणाऱ्याचा मोबाइल चोरी करतात की त्यांना आपला मोबाइल चोरी झाल्याचा पत्ताही लागत नाही. काही वेळेनंतर माहिती पडते की, आपला मोबाइल चोरी झाला आहे. अशा या गर्दीमध्ये खडका गावातील अनिल वारके यांच्या आईचा मोबाइल व पर्स हरविली. यामुळे त्यांच्याजवळ पैसे नव्हते. तसेच गाव दूर असल्यामुळे त्यांची बाजार करण्यासाठी धावपळ झाली.पर्स व मोबाइल हरविल्यामुळे कोणाला पर्स दिसली का असे लोकांना विचारीत असल्यामुळे ही माहिती परिसरात पसरली. आठवडे बाजारात पोलीस बंदोबस्त करीत असलेले ए.एस.आय. तस्लीम पठाण यांना ती हरविलेली पर्स व मोबाइल मिळाल्याने त्यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. मोबाइलमधील नंबर लावून तो मोबाइल कोणाचा आहे याची खात्री करून अनिल वारके याचा असल्याची माहिती मिळाल्याने त्याला बाजारपेठ पोलीस स्टेशनला बोलवले.पोलीस कर्मचारी व पत्रकार नीलेश के. फिरके यांच्यासमक्ष १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल व रोख २११० रुपये रोख पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. पठाण यांनी वारके यांच्या ताब्यात मोबाइल व पर्स दिली. यामुळे वारके सोबत आलेले पाच ते सहा मुलांनी तस्लिम पठाणचे आभार मानले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ