पारोळा : आशिया महामार्ग क्र. ४६ च्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. याचा निषेध म्हणून आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बायपासजवळ रविवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदारांनी नहीच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामाबाबत जाब विचारला.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गुणवत्तापूर्व व मुदतीच्या आत न झाल्यास याचे ठेकेदार, कंपनी, अधिकारी या सर्वांना परिणाम भोगावे लागतील अशा कडक शब्दात अधिकाऱ्यांना आमदारांनी सुनावले. शेवटी नहीच्या अधिकाऱ्यांनी चौपदरीकरणाचे काम गुणवत्तापूर्ण व मुदती होईल व ज्या ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले असतील ते सर्व खड्डे डांबराने भरले जातील असे लेखी दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनकर्त्यांच्या मागण्या त्वरित मार्गी लावण्यात येतील, असे लेखी निवेदन उपस्थित नही प्रा.लि.चे अधिकारी अरुण सोनवणे, पंकज प्रसाद, दिग्विजय पाटील, प्रदीप त्रिवेदी, अनुपकुमार श्रीवास्तव, नंदकुमार जोशी, शशी जोशी यांनी सह्यानिशी दिले.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती अमोल पाटील शेतकी संघाचे अध्यक्ष अरुण पाटील, माजी अध्यक्ष चतुर पाटील, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, उपसभापती दगडू पाटील, संचालक जिजाबराव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, एरंडोल तालुका प्रमुख वासुदेव पाटील, पारोळा शहरप्रमुख अशोक मराठे, युवासेना उपजिल्हा प्रमुख विवेक माळी, एरंडोल शहर प्रमुख कुणाल महाजन आदी उपस्थित होते.
फोटो