शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

आमदार सावकारे यांनी कुºहे (पानाचे) येथे केले श्रमदानातून नाल्यांचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:49 IST

आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे नाला खोलीकरण व सिमेंट बंधाऱ्यातील गाळ उपसण्याचे काम श्रमदानातून १९ मे रोजी करण्यात आले.

ठळक मुद्देजि. प. सदस्या पल्लवी सावकारेंसह नागरिकांची मोठी उपस्थितीग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग

भुसावळ, जि.जळगाव : आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे नाला खोलीकरण व सिमेंट बंधाऱ्यातील गाळ उपसण्याचे काम श्रमदानातून १९ मे रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, सरपंच रामलाल बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य नारायण कोळी यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या काही वषार्पासून पावसाचे प्रमाण अतिशय कमी होत आहे. त्यात नदी-नाल्यांमध्ये गाळ साचला आहे. त्यामुळे पाऊस पडला तरी हे पाणी वाहून जात असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. जमिनीतील पाणी पातळी टिकून रहावी यासाठी आमदारांनी तालुक्यातील कुºहे (पानाचे), चोरवड येथे नाला खोलीकरण करणे व सिमेंट बंधाºयातील गाळ उपसून पाणी जमिनीत जिरविण्यासाठी श्रमदानातून खोलीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आमदार सावकारे यांच्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. कुºहे पानाचे येथे रविवारी आमदार सावकारे यांनी रखरखत्या उन्हात उभे राहून परिसरातील दोन नाल्यांवर खोलीकरण करण्यासाठी उपस्थित राहिले व त्यांनी श्रमदानातून मोठ्या प्रमाणात हे काम करून घेतले.या श्रमदानाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे या कुºहे (पानाचे) येथे सकाळी सात वाजताच बोदवड रोडवरील नाल्यावरील बांधावर उपस्थित झाल्या. स्वत: हातात टोपली घेऊन आमदारांनी प्रारंभ केला. त्यानंतर या श्रमदानामध्ये उपसरपंच वासू वराडे, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण नागपुरे, प्रमोद उंबरकर, सुरेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.रमाकांत पाटील, बापू पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुनंदाबाई वराडे, कल्पना पाटील , अन्नपूर्णा पारधे, कोकिळाबाई पाटील, अनिल कुंभार, संजय पवार, धनराज पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले .मोंढाळा रोडवरील नाल्याप्रमाणेच गावापासून जाणारा तेलखोरा पाझर तलावाच्या नाल्यात श्रमदानातून नाला खोलीकरण, सिमेंट बंधाºयातील गाळ उपसण्याचे काम करण्यात आले. या कामामुळे यावर्षी पावसाळा चांगला झाल्यास नाला व बंधाºयामध्ये पाणी साचून जमिनीत झिरपून त्याचा काही प्रमाणात ग्रामस्थांना फायदा होऊ शकतो.दरम्यान, शनिवारी आमदार सावकारे यांनी शहरातील सांस्कृतिक फाउंडेशनच्यावतीने चोरवड नाला खोलीकरण उपक्रमात सहभाग घेतला व श्रमदान केले. दुसºयाच दिवशी रविवारी कुºहे (पानाचे) येथे हा उपक्रम राबवून त्यांनी सहभाग घेतला.दिवसेदिवस जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. त्याचप्रमाणे हिरवेगार वृक्षही सुकू लागले आहेत. वृक्षांची संख्या कमी होत असल्यामुळे त्याचा परिणाम निसर्गावर झाला आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून वृक्षारोपण करणे व नाला खोलीकरण सिमेंट बंधाºयातील गाळ काढून जमिनीत पाणी जिरवणे आदी उपक्रम हाती घेणे गरजेचे असल्याचे मत आमदार सावकारे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ