भुसावळ : बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी समाजात तेढ निर्माण होईल व बौद्ध समाजाचा अपमान होईल, असे वक्तव्य केल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व ‘वंचित’चे जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केले.
शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, कामगार आघाडी चिटणीस बालाजी पठाडे, तालुका सचिव गणेश इंगळे, तालुका संघटक गणेश रणशिंगे, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे, बंटी सोनवणे, विद्यासागर खरात, कुणाल सुरडकर, स्वप्निल सोनवणे, विजय सोनवणे उपस्थित होते.