शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिज सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 21:39 IST

विश्लेषण

जळगाव : जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असली तरीही वाळू वाहतूक सुरूच असून तीन दिवसात एकूण आठ वाहने जप्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असून तीन दिवसांपूर्वी बांभोरी येथील वाळू गटही रद्द करण्यात आल्याने वाळू उपशास आळा बसणे अपेक्षित आहे. असे असले तरी राजरोसपणे वाळू वाहतूक सुरुच असल्याचे समोर येत आहे.गुरुवारीदेखील तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर सावखेडा शिवारात नदी पात्रामध्ये पकडले होते. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी निमेखडी शिवारातील नदीपात्रातून वाळूची चोरी करताना दोन ट्रॅक्टर प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने पकडले.यात खंड न पडता पुन्हा शुक्रवारी मध्यरात्री मुरुमाची तीन व खडीची वाहतूक करणारे एक डंपर तर वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने जप्त केले आहे. हे पाचही वाहने जामनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या कामासाठी या गौण खनिजाची वाहतूक केली जात असल्याचे सांगितले जात असून या मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास सर्रासपणे गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारीही वाढत आहे. गेल्याच महिन्यात महामार्गाच्या कामासाठी मुरूमचा अवैधरित्या उपसा करून त्याची वाहतूक करीत असलेले दोन डंपर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनाच आढळून आले होते. क्षमतेपेक्षा अधिक मुरूमचा उपसा केल्याने त्या डंपर मालकांला एक कोटी तीन लाख चार हजारांचा दंड करण्यात आला होता, तरीदेखील हा उपसा सुरूच आहे.जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असताना वाळूचा बेसुमार उपसा सुरू असल्याचे दररोज समोर येत आहे. या सोबतच मुरुम, खडी यांचीही अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यात सध्या जळगाव-औरंगाबाद मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्या कामासाठी या मार्गावरुन गौण खनिजाची वाहतूक करणारे वाहने सुसाट जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे.शुक्रवारी मध्यरात्री महसूल विभागाचे पथक जळगाव-औरंगाबाद मार्गावर गस्त घालत असताना जामनेर तालुक्यातील पाळधीनजीक गौण खनिजाची वाहतूक करणारे चार डंपर पथकाला आढळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यात तीन डंपरमध्ये मुरुम तर एका डंपरमध्ये खडी आढळून आली. कागदपत्रांची विचारणा केली असता गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी असणाऱ्या पावत्यांवर महसूल विभागाचा शिक्का नव्हता व परवानाही नव्हता. पहाटे चार वाजता ही चारही डंपर जामनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या. तत्पूर्वी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नेरी येथे जामनेर फाट्यानजीक वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टरही आढळून आले. तेदेखील जप्त करण्यात येऊन जामनेर पोलीस ठाण्यात लावण्यात आले.संध्याकाळी सहा वाजेनंतर महामार्गाचे काम करू नये, असे शासनाचे १३ जानेवारी २०१८चे परिपत्रक आहे. मात्र, जळगाव-औरंगाबाद मार्गाच्या कामासाठी मध्यरात्रीच्या वेळी गौण खनिजाची सर्रास वाहतूक सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव