शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 12:25 IST

दोघ मित्रांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देमोटारसायकलवर बसवून नेलेमुलीने सोबत पैसे नेल्याचे उघडकीस

अमळनेर, जि. जळगाव : अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे एका साडे सतरा वर्षाच्या तरुणीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना १४ रोजी दुपारी ३ वाजता घडली होती. यात मित्राने मदत केली म्हणून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जवखेडा येथील एक अल्पवयीन मुलीचे आईवडील १४ रोजी धुळे येथे अंत्ययात्रेला गेलेले असताना मुलगी घरी लहान मुलीसोबत एकटी असताना बंटी त्र्यंबक पवार याने दुपारी ४ वाजेच्या सुमारास तिला फूस लावून मोटारसायकलवर बसवून नेले व गावाबाहेर असलेल्या त्याचा मित्र तात्या संभाजी मालचे याच्या ताब्यात दिले. तात्या मालचेने तिला आमिष दाखवून पळवून नेले. सायंकाळी आईवडील घरी आले असता लहान नातीने दुपारची हकीकत सांगितली. त्या अल्पवयीन मुलीने जाताना सोबत पैसे नेल्याचेही उघडकीस आले. मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून बंटी व तात्या यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण खैरनार करीत आहेत.

टॅग्स :KidnappingअपहरणJalgaonजळगाव