शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी संकुल पुन्हा गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:06 IST

जळगाव : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले शहरातील व्यापारी संकुल बुधवार, ५ आॅगस्टपासून पुन्हा उघडून थेट ग्राहकांसाठी खुले ...

जळगाव : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले शहरातील व्यापारी संकुल बुधवार, ५ आॅगस्टपासून पुन्हा उघडून थेट ग्राहकांसाठी खुले झाले. यामुळे साडे चार महिन्यांपासूनची तसेच १५ दिवसांपासून केवळ आॅनलाईन व्यवसायाच्या परवानगीची चिंता दूर झाली आहे. तब्बल १३६ दिवसांनतर व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. व्यापारी संकुल सुरू होताच ग्राहकांचीही खरेदीसाठी लगबग दिसून आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून शहरातील व्यापारी संकुले बंद असल्याने व्यापाऱ्यांसमोर संकट उभे राहण्यासह अर्थचक्रही मंदावले. चार महिन्यांच्या काळात महत्त्वाचे सण, उत्सव निघून गेल्याने माल भरून ठेवला असतानाही व्यवसाय करू शकत नसल्याने व्यापारी बांधव हतबल झाले होते. इतर व्यवसायांना परवानगी मिळत असताना केवळ संकुलातील दुकाने बंद असल्याने यासाठी संकुलांमधील व्यापारी बांधवांसह विविध व्यापारी संघटनांनी ही संकुले सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले.दुकाने सुरू होण्यासाठी पाठपुरावागेल्या अनेक दिवसांपासून व्यापारी संकुलांना परवानगी मिळत नव्हती. त्यात २० जुलैपासून काही निर्बंधांसह ही संकुले सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यात लहान संकुलांमधील दुकाने सम-विषम प्रमाणे उघडण्यात आली. मात्र मोठ्या मार्केटमधील दुकानांना केवळ दुपारी १२ ते ४ दरम्यान, होम डिलिव्हरी किंवा आॅनलाईन व्यवसायाची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता तब्बल १३६ दिवसांनंतर थेट ग्राहकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.अर्थचक्राला येणार गतीशहरातील बहुतांश व्यापार हा व्यापारी संकुलांमध्ये असल्याने ते सुरू झाल्याने आता शहराच्या अर्थचक्रालाही अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.तीन दिवस बंद, मार्ग निघणारव्यापारी संकुल सुरू झाले, याचे समाधान आहे. मात्र ते सप्ताहातील तीन दिवस बंद राहणार असल्याने याचीही चिंता आहे, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे. मात्र यावरही तोडगा निघेल, असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.ग्राहक देवो भव:.... बुधवार, ५ आॅगस्ट रोजी व्यापारी संकुल सुरू झाल्यानंतर व्यावसायिकांनी भगवंताचे नामस्मरण करीत शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा होऊन असे संकट पुन्हा न येवो, अशी प्रार्थना केली. दुपारी ग्राहकांचीही खरेदीसाठी लगबग असल्याचे दिसून आले. दुकानांमध्ये ग्राहक येताच अनेक दुकानदारांनी ‘ग्राहक देवो भव:’च्या उक्तीप्रमाणे त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव