शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मेमू रेल्वेखाली येऊन गुराख्यासह आठ जनावरे ठार, शिदवाडी गावाजवळची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 18:57 IST

जामदा ते राजमाने दरम्यान शिदवाडी गावाजवळ धुळे मेमू रेल्वेखाली येऊन एका गुरख्यासह आठ जनावरांचा मृत्यू झाला.

जिजाबराव वाघ

चाळीसगाव- जामदा ते राजमाने दरम्यान शिदवाडी गावाजवळ धुळे मेमू रेल्वेखाली येऊन एका गुरख्यासह आठ जनावरांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी चार वाजता घडला.

धुळ्याहून चाळीसगावकडे जाणाऱ्या मेमू रेल्वेला शिदवाडी गावाजवळ अपघात झाला. शिदवाडी येथील राजेंद्र भीमराव सूर्यवंशी (४५) हा गुराखी गुरे चारून गावाकडे येत होता. त्यावेळी अचानक गुरे रेल्वे समोर आली. रेल्वेच्या धडकेत २ गायी, २ बैल, २ म्हशी व १ वासरू, १ पारडू अशी ८ जनावरे व गुराखी राजेंद्र सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. काही जनावरे रेल्वे रुळापासून लांब फेकली गेली तर काही जनावरे रेल्वेखाली अडकली. अपघातानंतर सुमारे एक तास मेमू गाडी घटनास्थळी थांबून होती. रेल्वेखाली अडकलेली जनावरे काढल्यानंतर रेल्वे चाळीसगावकडे रवाना करण्यात आली.

ठार झालेली जनावरे प्रतापसिंग वजेसिंग जाधव यांच्या मालकीची होती. नुकताच ऊसतोडीच्या कामावरून घरी परतलेला राजेंद्र सूर्यवंशी त्यांच्याकडे गुराखी म्हणून कामाला होता. मृत राजेंद्रच्या पश्चात पत्नीसह मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने    कु टुंब  निराधार झाले आहे. या घटनेत प्रतापसिंग जाधव यांच्या मालकीचे सर्व पशुधन ठार झाले आहे. त्यांचे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.