शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मेहरुण चौपाटीवर उभारले गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:19 IST

इतर ठिकाणचे गतिरोधक काढले : वाहनधारकांना करावी लागते कसरत

जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशानुसार शहरातील रस्त्यांवरील सर्व गतिरोधक काढण्याचा सूचना मनपाला देण्यात आल्या होत्या. मात्र, महापालिका प्रशासनाने मध्यवर्ती भागातील गतीरोधक काढण्याव्यतिरीक्त इतर कॉलनी व उपनगरांमधील गतीरोधकांकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच मनपाने आता मेहरूण तलावाच्या चौपाटीलगत असलेल्या रस्त्यावर अनधिकृतपणे गतीरोधक उभारण्यात आले असून, हे गतीरोधक टाकताना कोणत्याही नियमांचे पालन देखील मनपाकडून करण्यात आलेले नाही.शहरात मनपाकडून उभारण्यात ८५० गतिरोधक उभारण्यात आल्याची नोंद होती. मात्र, सर्व गतिरोधक अनधिकृत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी माहितीच्या अधिकाराखाली काढल्यानंतर याबाबतची तक्रार त्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत केली होती. याच तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला शहरातील सर्व गतीरोधक काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, मनपा प्रशासनाने मध्यवर्ती भागातील रस्त्यावरील गतीरोधकाव्यतिरीक्त इतर भागातील गतिरोधक काढलेले नाहीत. शहरातील सर्व गतिरोधक अनधिकृत असताना दुसरीकडे मनपा प्रशासनाकडून मेहरूण तलावलगत असलेल्या रस्त्यावर गतिरोधकउभारल्यामुळे जिल्हाधिकाºयांचाच आदेशाची पायमल्ली मनपाकडून होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.समितीच नसताना गतिरोधकांना परवानगी कशी ?गतीरोधक तयार करताना आयआरसी (इंडियन रोड कॉँग्रेस) च्या नियमांनुसारच काम व्हायला हवे, गतीरोधक टाकण्याची परवानगी ही जिल्हा गतीरोधक समितीकडून घेतली जायला हवी, मात्र जिल्ह्यात तशी कोणतीही समिती अस्तित्वातच नसल्याने मनाप्रमाणेच गतिरोधक टाकले जात असल्याचेही समोर आले आहे. एका गतिरोधकाची उंची १० सेंटी मीटर तर लांबी ३.५ मीटर इतकी पाहिजे. मेहरुण तलाव भागात असलेल्या गतिरोधकांची उंची मनाप्रमाणे केली आहे. शहरातून गतिरोधक काढले जात असताना इथे मात्रे ते कुणाच्या परवानगी टाकले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कॉलनीमधील गतिरोधक काढायला हरकत काय ?महापालिकेला जिल्हाधिकाºयांनी आदेश देवून देखील शहरातील सर्व गतिरोधक काढलेले नाहीत. मध्यवर्ती भागातील गतिरोधक मनपाने अवघ्या दोन दिवसातच काढले. मात्र, कॉलनी व उपनगरांमधील गतिरोधक काढण्यास महापालिका प्रशासनाला काय हरकत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत मनपा बांधकाम विभागाचे अभियंता सुनील भोळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. शहरातील अनेक कॉलन्यांमध्ये मागणी नसताना मनपाने अनेक ठिकाणी आणि दहा ते १५ फूटावर गतिरोधक टाकले आहेत. आता तिथले गतिरोधक कधी काढले जातात, याची प्रतीक्षा आहे.मोठ-मोठ्यादगडांचा वापरगतिरोधक तयार करताना डांबर व खडीचा वापर केला जातो. मात्र, या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या गतिरोधकांमध्ये मोठ-मोठ्या गतीरोधकांचा वापर करण्यात आला आहे. तसेच गतीरोधकांची उंची देखील जास्त असल्याने मोटारसायकल चालकाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. एकूण नऊ गतिरोधक असून, सर्व गतिरोधकांची उंची सारखीच आहे. दरम्यान, या रस्त्यावर महाविद्यालयीन युवक मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवितात त्यामुळे हे गतिरोधक टाकण्यात आल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. मात्र, गतिरोधक टाकल्यामुळे अपघातांचीच जास्त भिती व्यक्त केली जात आहे. या गतिरोधकामुळे केव्हाही अपघात होऊ शकतो, अशी स्थिती सध्या मेहरुण तलाव परिसरात पहायला मिळत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव