शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद आरोग्य विभागात मेगाभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:54 IST

जळगाव : कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेने सुसज्जता म्हणून वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध ...

जळगाव : कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेने सुसज्जता म्हणून वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध पदांची भरती करण्याचे ठरवले असून त्यासंदर्भात जाहीरातही प्रसिध्द केली आहे. पालिकेतर्फे वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्सच्या पदांसाठी ०९ ते ११ जून यादरम्यान मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रीय आरोग्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेतर्फे एकूण ५४२ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांबाबतच्या मुलाखती १० जून रोजी घेण्यात येणार आहेत.‘अनलॉक’चा तिसरा टप्पा सुरु झाला असला तरी कोरोनाचा फैलाव थांबलेला नाही. कोरानाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना लॉकडाउनच्या काळातही बाजारपेठेतील गर्दी थांबलेली नव्हती. कोरोनाचा प्रसार वाढत असताना आरोग्य यंत्रणा कोठेही कमी पडू नये, यासाठी पालिका आणि जिल्हा परिषद सतर्क झाली असून या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदभरती सुरु झाली आहे. एमबीबीएस वा बीएएमएस तरूणांकडून वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागवले असून स्टाफ नर्स या पदासाठीही जाहीरात काढण्यात आली आहे. या पदांसाठी ०९ ते ११ जून या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत आयुक्त कार्यालय, महानगरपालिका येथे मुलाखत घेतली जाणार आहे.पालिकेबरोबरच जिल्हा परिषदेनेही राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कोविड-१९च्या धर्तीवर महाभरती सुरु केली आहे. याबाबतच्या मुलाखती १० जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत. या महाभरतींतर्गत फिजिशिअनची १६ पदे, भूलतज्ज्ञांची १४, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)ची ४६, आयुष वैद्यकीय अधिकारी ३२, हॉस्पिटल व्यवस्थापक २१, स्टाफ नर्स ३१६, एक्स-रे तंत्रज्ञ १२, ईसीजी तंत्रज्ञ-८, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-४, फार्मासिस्ट-२५, स्टोअर आॅफिसर २१, डाटा एन्ट्री आॅपरेटर २७ अशी पदे भरली जाणार आहेत.

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव