शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

सर्व पक्षीय सदस्यांनी रोखली जळगाव जि.प.च्या स्थायी समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:49 IST

१० कोटींच्या काम वाटपात दुजाभाव

जळगाव : १० कोटींच्या कामांच्या वाटपात दुजाभाव केल्याच्या आरोपावरुन सर्वपक्षीय सदस्यांनी आज जि.प. च्या स्थायी समितीत धडक मारली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. शेवटी सभा आटोपल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्षांनी यात हस्तक्षेप केला आणि या कामांना स्थगिती दिल्याने या वादावर पडदा पडला.जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला काही कोटींचा निधी आला होता. उर्वरित १० कोटी अर्थात तीस टक्के निधीबाबत अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना सर्व अधिकार देण्यात आले होते़ मात्र, आपल्याला अंधरात ठेवत अध्यक्षा, उपाध्यक्ष, सभापती, गटनेते व काही सदस्यांनी या निधीतून परस्पर कामे टाकल्याचा आरोप झाला.शनिवारी स्थायी समितीची सभा सुरु होती. यात लालचंद पाटील, गजेंद्र सोनवणे, रवींद्र पाटील, जयश्री पाटील, डॉ़ निलीमा पाटील, जयश्री पाटील, रवींद्र पाटील, कैलास सरोदे, मिना पाटील, प्रमिला पाटील, गोपाळ चौधरी आदींसह पंधरा ते वीस सदस्यांनीअचानक या ठिकाणी धडक दिली व उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना अतिरिक्त कामांबाबत जाब विचारला़ अध्यक्षा उज्ज्वला पाटील उपस्थित नसल्याने त्यांना सर्व अधिकार आहेत, त्यांना याबाबत माहिती असल्याने त्या आपल्या शंकांचे निरसन करतील, असे उपाध्यक्षांनी सांगितले़दरम्यान, हा प्रश्न मार्गी न लागल्यास आम्ही सर्वपक्षीय सदस्य उपोषणाला बसू असा पवित्रा सदस्य लालचंद पाटील यांनी घेतला होता़ ४५ हजार लोकांमधून आम्ही निवडून येतो, कामे नसल्याने लोक आम्हाला जाब विचारतात, अशा शब्दात त्यांएनी संताप व्यक्त केला़एक चर्चा अशीहीअध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना कामांचे वाटप करण्याचे सर्व अधिकार सभेत देण्यात आले होते़ याला अनेक सदस्यांचा विरोध होता, मात्र, ज्यांनी अधिकार दिले त्यांनाच कामांपासून वंचित ठेवण्यात आल्याचेही बोलले जात होते़तुम्ही मान्य करा आम्ही सोडून देऊ़़अतिरिक्त कामांच्या मुद्द्यांवरून सदस्यांनी संतप्त भावना मांडल्या़ अधिकाऱ्यांना जाब विचारला, शिक्षणाधिकारी स्वल्पविराम देऊन देऊन कामाला बगल देतात.असेही ते म्हणाले. ,मधू काटे यांनी किती कामे टाकली ते मान्य करावीत आम्ही निधीचा विषय सोडून देऊ, असा टोलाही पाटील यांनी लगावला़ आम्ही नवीन असल्याने आम्हाला काही समजत नाही, असे गृहीत धरून आम्हाला अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला़गटनेत्यांना घेरावभाजपचे गटनेते तथा शिक्षण सभापती पोपट भोळे यांना या संतप्त सदस्यांनी सभागृहाच्या बाहेर घेराव घातला़ जाब विचारला त्यानंतर पोपट भोळे हे पूर्ण सभा बाहेरच थांबून होते़ त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष डॉ़ संजीव पाटील आले त्यांनी पोपट भोळे यांच्यासोबत वेगळ्या दालनात चर्चा केली त्यानंतर ते भाजप कार्यालयात निघून गेले़जि़ प़ ते भाजप कार्यालयसंतप्त सदस्यांनी जिल्हाध्यक्ष डॉ़ संजीव पाटील यांची भाजप कार्यालयात भेट घेतली. जिल्हाध्यक्षांनी जि.प.अध्यक्षांशी संपर्क साधून कामे थांबविण्याची सूचना केली. तसेच यासाठी आमदार गिरीश महाजन यांच्याशी बोलणे करू, असे आश्वासन दिले़

टॅग्स :Jalgaonजळगाव