खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषद २६ रोजी चाळीसगाव येथे होत असल्याने बैठक आयोजित करण्यात आली होती . बैठकीच्या अध्यक्षस्थानी शंकर महाजन हे होते. यावेळी खान्देश सत्यशोधक परिषदेचे आयोजन समितीचे अध्यक्ष भीमराव खलाणे, परिषदेचे प्रमुख वक्ते सुरेश झाल्टे, अर्जुन माळी, माजी सरपंच आबा महाजन, समता परिषद तालुका अध्यक्ष कैलास जाधव, धर्मा काळे, उपसरपंच गोकुळ महाजन, दिनेश महाजन, रमेश महाजन, अशोक महाजन, पितांबर माळी, तुळशीराम सोनवणे, सोमनाथ माळी ,ज्ञानेश्वर महाले, विजय शेवाळे, दिलीप आहिरे, बापू माळी, सुरेश माळी, वासुदेव रोकडे, संदीप महाजन, नामदेव जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते . यावेळी सूत्रसंचालन सुरेश बच्छाव यांनी केले व आदर्श शिक्षक अर्जुन माळी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
सायगाव येथे सत्यशोधक परिषदेची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST