आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.१२ : न.पा.च्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर रेल्वे परिसरातील झोपडपट्टीधारकांना पर्यायी जागा देण्यासंदर्भात विषय का घेतला नाही या प्रश्नावरून जनाधार पार्टीच्या दोन महिला नगरसेवकांमध्ये वाद होऊन एकमेकीच्या अंगावर धाऊन आल्याने सभागृहासह काही काळ तणाव निर्माण झाला. याचा फायदा सत्ताधारी गटाने घेत सर्व विषय अवाजी बहुमताने मंजुरीची घोषणा केली. अवघ्या तीन मिनिटात सभा गुंडाळली. विरोधकांनी मात्र हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप करून सत्ताधाºयांनी सभागृहातून पळ काढल्याचा आरोप केला आहे.न.पा.ची १२ रोजी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर व गटनेते मुन्ना तेली होते. सभेत ७९ विषय ठेवण्यात आले होेते. सभा सुरू होताच स्वीकृत नगरसेविका पुष्पा सोनवणे यांनी शहरातील रेल्वे परिसरातील झोपडपट्टी हटाव प्रकरणाने झोपडपट्टीवासीय बेघर होणार आहेत. या गोष्टीची जाणीव सर्वच लोकप्रतिनिधींना आहे. तरी ही अजेंड्यावर झोपडपट्टीवासीयांच्या पुर्नवसनाचा प्रश्न का घेतला नाही. असा प्रश्न पुष्पा सोनवणे यांनी उपस्थित केला व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी ही मोर्चा काढण्याचे नाटक असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावेळी सभागृहात उपस्थित नगरसेविका पुजा सूर्यवंशी यांनी ते सभागृहाचे नगरसेवक नसताना त्यांच्या नावाचा उल्लेख का केला? असे म्हणून दोन्ही नगरसेविका एकमेकांशी भिडल्या. नगरसेविका सूर्यवंशी यांनी सोनवणे यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला. यावेळी सभागृहात प्रचंड आरडाओरड सुरू झाली. पिठासीन अधिकारी यांनी सर्व विषय अवाजी बहुमतांनी मंजूर करून सभा संपल्याचे जाहीर केले.
भुसावळ नगरपालिकेची सभा अवघ्या तीन मिनिटात गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:00 IST
जनाधारच्या महिला नगरसेवकांमध्ये तू तू-मैं मैं . नगरसेविका पुष्पा सोनवणे यांनी दिला राजीनामा
भुसावळ नगरपालिकेची सभा अवघ्या तीन मिनिटात गुंडाळली
ठळक मुद्देनगरसेविका पुष्पा सोनवणे यांनी दिला राजीनामाजनाधारच्या महिला नगरसेवकांमध्ये तू तू-मंै मंैसत्ताधाºयांनी सभागृहातून पळ काढल्याचा विरोधकांचा आरोप