शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील शनी पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगार पडताळणी बैठकीत दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 17:05 IST

गुन्हेगार पडताळणी बैठक सुरु असताना साहेबराव राधेश्याम ढंढारे (रा.गुरुनानक नगर, जळगाव) या मनोरुग्णाने पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या दिशेने दगडांचा मारा केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी शनी पेठ पोलीस स्टेशनच्या आवारात घडला. दरम्यान, दगडफेक करणा-याचा शोध घ्यायला गेलेल्या ज्ञानेश्वर कोळी या पोलीस कर्मचा-याच्या हाताला ढंढोरे याने चावा घेतला.

ठळक मुद्दे मनोरुग्णाचा प्रताप पोलिसालाही घेतला चावा अधिकारी, कर्मचारी झाले अवाक्

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१०: गुन्हेगार पडताळणी बैठक सुरु असताना साहेबराव राधेश्याम ढंढारे (रा.गुरुनानक नगर, जळगाव) या मनोरुग्णाने पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या दिशेने दगडांचा मारा केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी शनी पेठ पोलीस स्टेशनच्या आवारात घडला. दरम्यान, दगडफेक करणा-याचा शोध घ्यायला गेलेल्या ज्ञानेश्वर कोळी या पोलीस कर्मचा-याच्या हाताला ढंढोरे याने चावा घेतला.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशानुसार प्रत्येक उपविभागात दर शनिवारी एका पोलीस स्टेशनला गुन्हेगारांची पडताळणी केली जात आहे. त्यानुसार शनिवारी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हेगारांची पडताळणी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचा-यांनाही बोलावले जाते. या बैठकीत शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १२ गुन्हेगारांना बोलावण्यात आले होते. सर्व अधिकारी, कर्मचारी उपअधीक्षक सचिन सांगळे यांची प्रतिक्षा करीत असताना अचानकपणे बैठकीच्या ठिकाणी दगडांचा मारा सुरु झाला, त्यामुळे सर्वच जण अवाक् झाले.